नाशिक - प्रदूषणमुक्तगणेशोत्सवाची संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी ‘दिव्य मराठी’ ऊर्जा प्रतिष्ठानतर्फे इको फ्रेंडली घरगुती आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले असून, प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नाशिकरोड येथील आस्था मंडाले यांच्या आराशीला मिळाले आहे. खादी संस्कृतीचा पुरस्कार करीत मंडाले यांनी शाडू मातीचा खादी गणेश साकारला होता. विजेत्यांना येत्या मंगळवारी (दि. २३) महाकवी कालिदास कलामंिदरात पारितोषिके देण्यात येणार आहेत.
‘दिव्य मराठी’ ऊर्जा प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या घरगुती आरास स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत तब्बल साडेतीनशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आस्था मंडाले यांना, द्वितीय क्रमांकाचे माधुरी देशपांडे यांना, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रणव गायकवाड यांना जाहीर झाले आहे. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ पारितोषिक गाैरी पांडे, चंद्रकांत धांडे, दिवाकर कुलकर्णी, हेमा भूमकर, प्रशांत भंडारे यांना जाहीर करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने यंदा विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले. शाडू मातीच्या मूर्तींचे महत्त्व पटवून देत प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित करण्याचे आवाहन केले होते. त्यास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा अनेकांनी पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेत देखावे साकारले.
प्रणव गायकवाड यांनी साकारलेली पॉवर प्लँटची आरास.
माधुरी देशपांडे यांनी साकारलेली देशपांडे वाड्याची आरास.
आस्था मंडाले यांंनी साकारलेली खादी गणेशाची आरास.
कलात्मकतेचीही जोड...
*‘दिव्यमराठी’ आणि ऊर्जा प्रतिष्ठानच्या स्पर्धेत साडेतीनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला. असंख्य पर्यावरणपूरक देखावे साकारण्यात आले होते. त्यामुळे परीक्षणावेळी मोठी कसोटी होती. पर्यावरण पूरकतेबरोबरच कलात्मकता आणि सामाजिक संदेश या बाबी बघत आम्ही अंतिम विजेते निश्चित केले. -प्रसन्ना तांबट,प्रसिद्धमूर्तिकार, परीक्षक
..असे आहे बक्षिसाचे स्वरूप
स्पर्धेतप्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपये स्मृतिचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. पाच उत्तेजनार्थ विजेत्यांना स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.