आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे वाटपाच्या तक्रारी; पथकाच्या हातात मात्र काहीच नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पटवण्यासाठी लक्ष्मीदर्शनाचे प्रयाेग सुरू झाल्यामुळे अाचारसंहिता कक्षाची धावपळ उडाली. प्रत्यक्षात तक्रारीनंतर काही मिनिटांत पाेहोचूनही हाती काहीच लागत नसल्याने तक्रारी नेमक्या खऱ्या की यंत्रणेची कसाेटी बघण्याचे प्रयत्न केले जात अाहे का, असा प्रश्न पडला. दरम्यान, काही ठिकाणी पथक वेळेत पाेहोचल्यामुळे वा तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली गेल्यामुळे अशा प्रकारावर पडदा टाकला गेल्याची चर्चा अाहे. 
 
उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी लक्ष्मीदर्शनाद्वारे मनवण्याचे प्रयत्न सुरू झाले. ही बाब लक्षात घेत पाेलिस महापालिका पथकाकडून डाेळ्यांत तेल घालून पेट्राेलिंग सुरू हाेते. दरम्यान, असे गैरप्रकार महापालिकेला कळवण्यासाठी व्हॅाट्सअॅप क्रमांक संकेतस्थळही दिले अाहे. या ठिकाणी साेमवारी दाेन तक्रारी अाल्या. त्यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक मधील मखमलाबाद गाव येथे पैसे वाटप केले जात अाहे, तर प्रभाग क्रमांक २० शी संबंधित बिटकाे चाैकात पैसे वाटप केले जात असल्याच्या तक्रारी हाेत्या. तेथे काही मिनिटांत पथक पाठवले, मात्र हाती काही लागले नसल्याचे अाचारसंहिता कक्षप्रमुख सरिता नरके यांनी सांगितले. 
 
राजलक्ष्मी बँकेप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासणार 
भाजप उमेदवारासाठी राजलक्ष्मी बँकेचे कर्मचारी वाहन वापरल्याप्रकरणी अाचारसंहिता कक्षाने अाता सीसीटीव्ही फुटेज संपूर्ण तपासण्याचा निर्णय घेतला अाहे. हे प्रकरण चाैकशीसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवण्यात अाले अाहे. दरम्यान, महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांविराेधात अाचारसंहिता भंगाच्या तक्रारी अाल्या अाहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...