आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदींविरुद्ध जयपूर, नाशिकमध्ये तक्रार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/जयपूर - लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये शनिवारी मागासवर्गीय, अनुसूचित जाती/जमातीचे लोकच भ्रष्टाचारी असल्याचे वक्तव्य करणारे प्रसिद्ध लेखक आशिष नंदी यांनी शनिवारीच माफी मागितली असली तरी यावरून जयपूरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकमध्येही तक्रार दाखल करण्यात आली आहे. जयपूर पोलिसांनी चौकशीसाठी याचे व्हिडिओ फुटेज मागवले आहे.

दरम्यान, रविवारी ‘हिंदी-इंग्लिश भाई भाई’ या परिसंवादात भाग न घेता नंदी यांनी जयपूर सोडले आहे. सोमवारी फेस्टिव्हलचा समारोप होत आहे.
चुकीचा अर्थ लावला
‘माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ लावला आहे. मागसवर्गीय लोक पकडले जातात म्हणून भ्रष्टाचार दिसतो, असे मला म्हणायचे होते,’ असे स्पष्ट करून नंदी यांनी माफीही मागितली.