आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्युच्युअल फंडासाठीही अाता अाधार संलग्न करणे सक्तीचे, अन्‍यथा जानेवारीपासून रक्कम भरण्‍यास अडचण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बँक खाते, विमा पाॅलिसी त्यानंतर अाता म्युच्युअल फंडाकरीताही ‘अाधार’ क्रमांक संलग्न करणे सक्तीचे करण्यात अाले अाहे. सेबीने काढलेल्या अादेशानूसार ३१ डिसेंबरपर्यंत म्युच्युअल फंडात गुंतवणूक असलेल्यांना त्यांच्या फाेलीअाेशी अाधार क्रमांक संलग्न करावा लागेल. तसे केल्यास जानेवारी २०१८ पासून फंडात पैसे टाकता येणार नाहीत, उलट पैसे काढताना अाधार क्रमांक द्यावाच लागणार अाहे. 

 

डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करताना काळा पैसा बाहेर काढण्याला सरकार प्राधान्य देत असून त्याचाच भाग म्हणून बँक खात अाणि अाता म्युच्युअल फंडांना अाधारशी जाेडणे सक्तीचे करण्यात अाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत अाहे. गेल्या तीन वर्षांपासून अाणि विशेषत: नाेटबंदीनंतर बँक ठेवी, पाेस्टाच्या ठेवी, साेने, रियल इस्टेट या हुकुमी गुंतवणुकीतून अपेक्षीत परतावा मिळत नसल्याने बहुतांश लाेक म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे वळले अाहेत. अनेकांनी अापला काळा पैसा ( अघाेषित) इकडे वळविल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अाधार लिंक केल्यानंतर ही बाब समाेर येण्यास मदत हाेणार अाहे. ही महत्त्वाची तर अाहेच याचबराेबर अधिक पारदर्शी, जलद सेवाही ग्राहकांना यामुळे मिळू शकणार अाहे. 


अाधार संलग्नता लाभदायक 
म्युच्युअलफंड म्हणजे केवळ चांगले उत्पन्न मिळवायचे साधन नसून, उत्पन्नाबरोबर जोखीम व्यवस्थापन करण्याचेही ते एक उत्तम साधन असल्याने गुंतवणूकदार माेठ्या प्रमाणात त्याकडे वळले. म्युच्युअल फंडात किमान गुंतवणूक ५०० रुपये असते. त्यामुळे लहान गुंतवणूकदार देखील एका विस्तृत भागभांडारात पैसे गुंतवू शकतात. यामुळे लहान गुंतवणूकदारही याकडे वळू लागला अाहे. आधारसंलग्न झाल्यामुळे फंडांना तसेच भांडवल बाजारातील मध्यस्थांना गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा आढावा घेणे शक्य होणार आहे. याचा फायदा ९० कोटी आधार कार्डधारकांना होईल. सध्या पॅन क्रमांक असलेल्या नागरिकांची संख्या १७ कोटी आहे. त्यामुळे गुंतवणूक योजना आधारसंलग्न होणे हेच अधिक फायद्याचे आहे. 

 

सुपर रेग्युलेटर नेमणुकीची गरज 
सुरूवातीला रिझर्व्ह बँकेने बँक खात्यांना अाधार सक्तीचे केले, त्यानंतर इर्डाने विमा पाॅलिसींना अाधार संलग्न करणे सक्तीचे केले. त्यानंतर अाता अाता सेबीने म्युच्युअल फंडाकरीता ही सक्ती केली अाहे. मात्र बंॅकांत केवायसीची प्रक्रिया ज्या ग्राहकांनी पूर्ण केली अाहे. त्यांचा अाधार अशा इतर गुंतवणुकीनांही अापाेअापच लिंक का हाेत नाही? हा खरा प्रश्न अाहे. याकरीता वेगवेगळ्या नियंत्रण संस्थांकडून वेगवेगळे काम हाेण्यापेक्षा या सर्वच संस्थांवरील एक प्रमुख नियंत्रण संस्था ( सुपर रेग्युलेटर) नेमला गेल्यास ग्राहकांचा हा त्रास वाचू शकताे. याकरीता सुपर रेग्युलेटरची गरज व्यक्त केली जात अाहे. ग्राहकांनीही सगळ्या गुंतवणुकीत वेगवेगळे बदल हाेत असतांना गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे केव्हाही संयुक्तिक ठरू शकते. 

 

 

अाधार लिंक प्रक्रिया साेपी 
म्युच्युअल फंडस‌् हे कार्वि, कॅम्स, सुंदरम अाणि फ्रँकलिन टेम्पल्टन या चार संस्थांच्या अंतर्गत अाहेत, त्यामुळे यांच्या कार्यालयात जाऊन किंवा या संस्थांनी दिलेल्या लिंकवर जाऊन अापला पॅन क्रमांक टाकला की अाधार क्रमांक टाकायचा अाहे. अापल्या गुंतवणूक सल्लागाराकडे जाऊनदेखील ही प्रक्रिया पूर्ण करता येते. 
- मुकेश चाेथाणी, गुंतवणूक सल्लागार 

 

कंपन्यांकडूनही ग्राहकांशी संपर्क साधण्यास प्रारंभ 
बहुतांश म्युच्युअल फंड कंपन्यांनी यासाठी ग्राहकांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली अाहे. त्याकरीता एसएमएस, मेलचा वापर केला जात अाहे. मुदतीत अाधार संलग्न केल्यास मात्र फंडाचे लाभ मिळणे दुरापास्त हाेणार अाहे. 
- विश्वनाथ बाेदाडे, अर्थतज्ज्ञ 

बातम्या आणखी आहेत...