नाशिक- संत गुलाबराव महाराज यांनी डोळे नसतानाही ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांचे हे विचार, साहित्यसंपदा र्मयादित न राहता ती अन्य प्रादेशिक भाषांमध्येही पोहोचविण्याची गरज आहे. त्यांचे साहित्य सोप्या शब्दांत व प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित झाल्यास विचारांचा प्रसार होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे केले. गुलाबराव महाराज यांच्या साहित्यावर संशोधनाची गरज असल्याचेही ते म्हणाले.
पुणे येथील र्शी संत गुलाबराव महाराज सर्वोदय ट्रस्ट व गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे शनिवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सातव्या र्शी संत गुलाबराव महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. भटकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर अँड. यतिन वाघ, स्वागताध्यक्ष डॉ. एम. एस. गोसावी, गोविंददेव गिरी स्वामी महाराज, आचार्य किशोर व्यास, प्रसाद महाराज अमळनेरकर, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे, डॉ. यशवंत पाठक, नारायण मोड आदी उपस्थित होते.
डॉ. भटकर म्हणाले, की विदर्भ ही संतांची भूमी आहे. येथील संतांचे कार्य, विदर्भातील साहित्य घरोघरी पोहोचविण्याचे काम सर्वांनी करायला हवे. ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रावर संत गुलाबराव महाराजांनी प्रकाश टाकला आहे. 21 वे शतक भारताचे असून, अमेरिकेच्या महत्त्वाच्या पाहणीतही त्याची दखल घेण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी गुलाबराव महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. गुलाबराव महाराजांची प्रेरणा घेत शिक्षण घेऊन संस्कृती जपण्याची गरज असल्याचे डॉ. गोसावी यांनी सांगितले. या वेळी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांना ‘र्शी संत गुलाबराव महाराज 2014’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रारंभी सकाळी र्शी काळाराम मंदिर ते परशुराम साईखेडकर नाट्यगृह मार्गावर ग्रंथदिंडी काढण्यात आली होती.
संमेलनात आज..
रविवारी प्रथम सत्रात सकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान डॉ. एम. एस. गोसावी, पद्र्मशी डॉ. विजय भटकर, डॉ. पंकज चांदे, डॉ. यशवंत पाठक हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारच्या सत्रात पद्मर्शी डॉ. विजय भटकर आणि गोविंददेव गिरी स्वामी महाराज हे ‘अध्यात्म व विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर यांचे कीर्तन होणार आहे. गुलाबराव महाराज साहित्य संमेलनाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना डॉ. विजय भटकर. समवेत डॉ. मो. स. गोसावी, आचार्य किशोर व्यास, गोविंददेव गिरी, महापौर अँड. यतिन वाघ आदी.