नाशिक- विज्ञान, अध्यात्म आणि वेदाचा समन्वय शक्य असल्याचे सांगतानाच भक्तियोगाच्या सार्मथ्याने अदृश्य होणेदेखील शक्य असल्याचे प्रतिपादन परममहासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी केले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित तीनदिवसीय र्शी संत गुलाबराव महाराज साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी डॉ. भटकर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, रामकृष्ण महाराज लहवितकर, नारायण मोहोड आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना डॉ. विजय भटकर यांनी जीवनात गुरुकृपेचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले. विज्ञान म्हणजे प्रपंचाचे ज्ञान तर अध्यात्म म्हणजे स्वस्वरूपाचे ज्ञान असल्याचेही त्यांनी नमूद केले. विज्ञान, अध्यात्म आणि वेद यांचा समन्वय साधणे शक्य असून, अशा प्रकारच्या साहित्य संमेलनातून ते साध्य करणेदेखील शक्य असल्याचे डॉ. भटकर म्हणाले.