आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणक परिचालकांचा ‘महसूल’वर मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - ई-पंचायत प्रकल्पावर नियुक्त संगणक परिचालकांना शासन सेवेत समाविष्ट करून वेतनश्रेणी लागू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी संगणक परिचालक कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी विभागीय महसुल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेचे राज्य संयोजक राजू देसले, जिल्हाध्यक्ष योगेश नवले यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढलेल्या मोर्चाचे रूपांतर विभागीय कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर सभेत झाले. संगणक परिचालक ग्रामपंचायतीत ई-पंचायत प्रकल्पात महत्त्वाची कामे करतात.

दरम्यान, एकात्मिक बालविकास प्रकल्पातील संगणक परिचालकांना 22 हजार रुपये वेतन दिले जाते. या तुलनेत परिचालकांना कमी वेतन मिळते. त्यामुळे शासनाने मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी मोर्चेक-यांनी केली. मोर्चात जिल्हा सचिव हेमंत पगारे, उपाध्यक्षा प्रिया सोनवणे, राज्य संघटक राकेश देशमुख, सहसचिव सुरेश पाटील, संघटक शांताराम बेंडकुळे, सदस्य बापु मोरे, नरेंद्र बेलेकर, सचिन संगमनेरे, सागर इप्पर आदींचा समावेश होता.

निवेदनाद्वारे संघटनेने केल्या या मागण्या
आठ हजार रुपये वेतनासह बैठक व प्रवास भत्ता द्यावा, कंत्राटी कराराप्रमाणे मानधन फरक, थकीत मानधन द्यावे, जीवन विमा, भविष्यनिर्वाह निधी, राहणीमान, महागाई भत्ता लागू करावा, पंचायत विकास अधिकारी पदावर परिचालकांची नियुक्ती करावी, ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा द्यावी व परिचालकांना सन्मानाची वागणूक द्यावी.