आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘श्वासावरील नियंत्रणाने एकाग्रता शक्य’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मनाला एखादी गोष्ट करायला सांगितली की ते त्याच्या उलट करते. त्यामुळे मनावर नियंत्रण मिळवायचे असेल, तर प्रथम श्वासावर लक्ष केंद्रित करून त्यावर नियंत्रण मिळवा, असा सल्ला आर्ट ऑफ लिव्हींगचे आनंदस्वामी यांनी दिला.
येथील क्रीडा प्रबोधिनी, यशवंत व्यायामशाळा आणि आर्ट ऑफ लिव्हींगच्या वतीने खेळाडू आणि त्यांच्या पालकांसाठी एका विशेष मेडीटेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. संतोष कापडणे यांनी कार्यक्रम घेण्यामागील संकल्पना विशद केली. खेळाडूंना या उपक्रमाने निश्चितच लाभ होईल, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमासाठी मंदार देशमुख, विजय हाके, संजय होळकर, राजेश क्षत्रिय, किरण कवीश्वर, ऋषिकेश वाकचौरे, योगेंद्र पाटील, योगेश शिंदे, विलास पाटील, हेमंत पाटील, उमेश आटवणे, अनिल ठाकरे उपस्थित होते. यावेळी विविध वयोगटातील दोनशे खेळाडू आणि पालक उपस्थित होते.