आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Conduct Of Election Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईदगाह मैदानावर सभांचा दणका की फटाक्यांचा मेळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ईदगाहमैदानावर फटाके स्‍टॉल उभारणीसाठी पालिकेने दिलेली परवानगी यंदा विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे. राजकीय नेत्यांच्या सभांचा ताण वाढल्यास जिल्हाधिका-यांकडून या मैदानाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे मैदान सभांसाठी राखीव ठेवायचे की फटाके स्‍टॉलधारकांसाठी, असा मोठा पेच पालिकेसमोर निर्माण झाला असून, त्यात आता नेमके कोणाचे फटाके फुटणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिनाभरापूर्वी त्र्यंबकरोडवर गणेशमूर्ती विक्रेत्यांना गाळे देण्याचा प्रश्न चांगलाच गाजला होता. महापालिकेने वेळेत निर्णय घेतल्याने परस्पर गाळे उभारले गेले होते. आता काहीसा तसाच नवा वाद या मैदानावरील दाव्यावरून निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षीप्रमाणे फटकेविक्रेत्यांनी येथे स्टॉल्ससाठी जागा मागितली आहे. स्टॉल्सची संख्या निश्चित नसली तरी येथे यापूर्वी साधारण 60 स्टॉल्स लागले होते.
यंदा विधानसभेच्या आचारसंहितेमुळे स्टॉल्सचा प्रश्न जिल्हाधिका-यांच्या कोर्टात गेला आहे. प्रचारासाठी कमी कालावधी राहिला असून, १५ ऑक्‍टोंबरला मतदान होत आहे. दुसरीकडे फटाकेविक्रेत्यांचे स्‍टॉल १० ऑक्‍टोंबारच्या आसपास लागणार आहेत. नेमक्या याचवेळी सभांचा ज्वर तापणार असल्यामुळे जिल्‍हाधिका-याकडून हे मैदान आरक्षित ठेवले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने हा प्रश्न तूर्तास जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात पाठविला आहे. त्यांच्याकडून नकार आल्यास महापालिकेची अडचण मात्र विना कटकट सुटणार आहे.
परवानगीनंतरच निर्णय
ईदगाहमैदानाची जागा दरवर्षी फटाकेविक्रेत्यांना दिली जाते. यंदाही मागणी आली. असून, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे निवडणूक शाखेची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. रोहिदासबहिरम, उपायुक्त,कर विभाग