आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conference On Agricultural Literature From Tomorrow In Nashik

उद्यापासून नाशिकमध्ये कृषी साहित्य संमेलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-पद्र्मशी विखे पाटील प्रतिष्ठान आणि र्शी स्वामी सर्मथ सेवामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 24 जानेवारीपासून अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनास प्रारंभ होत असून, कृषी साहित्यिक, शेतकरी व सेवेकर्‍यांच्या स्वागतासाठी डोंगरे वसतिगृहावर उभारण्यात आलेली डॉ. पंजाबराव देशमुख नगरी सज्ज झाली आहे.

तीन दिवस चालणार्‍या या कृषी संमेलनाची सुरुवात शुक्रवारी सकाळी कृषी ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर 11.30 वाजता होणार्‍या उद्घाटन सोहळ्यास प. पू. अण्णासाहेब मोरे, पालकमंत्री छगन भुजबळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील, सुनील तटकरे, ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव, राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संमेलनात कृषी पर्यटन, सेंद्रिय गटशेती, मधुमक्षिकापालन, कृषी स्वयंरोजगार, गांडूळखत, कंपोस्ट खत निर्मिती, बायोगॅस, सेंद्रिय दूध, कृषी वास्तुशास्त्र अशा अनेक बाबींवर शेतकर्‍यांना तज्ज्ञांतर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषी साहित्य संमेलनातील स्वावलंबी गाव, फळे, फुले, धान्य महोत्सव खास आकर्षण असणार आहे. विविध कृषी उत्पादनांची, तसेच बचतगटांच्या उत्पादनांच्या थेट विक्रीसाठी स्वतंत्र दालन येथे असणार आहे. आध्यात्मिक, पारंपरिक, आधुनिक व सेंद्रिय शेती यांची सांगड घालण्याविषयी मार्गदर्शनासह कार्यशाळा, परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. नामांकित कंपन्यांची खते, औषधे, आधुनिक यंत्रसामग्री, उपकरणे, औजारे यांचे भव्य प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.