आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conference On Sustainable Development In IMRT College

विद्यार्थी अन् उद्योजकांमधील संवाद वाढवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - व्यवस्थापनाचे शिक्षण घेताना विद्यार्थी उद्योजकांमधील संवाद घडावा, यासाठी महाविद्यालयांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापनशाखेचे अधिष्ठाता डॉ. इ. बी. खेडकर यांनी शनिवारी केले. ‘आयएमआरटी’ महाविद्यालयात शाश्वत विकासावर आयोजित दोनदिवसीय परिषदेत ते बोलत होते.
आैद्योगिक क्षेत्रासह सेवा पुरविणाऱ्या क्षेत्रामध्ये व्यवस्थापकीय प्रक्रियेला अधिक महत्व प्राप्त झाले असून, यात करिअरच्या संधी वाढल्या आहेत. उद्योगांना हवे असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने व्यवस्थापकीय शिक्षणात बदलत्या काळानुरुप बदल केले जात असून, नवीन अभ्यासक्रम आखण्यात आले आहेत. सर्व्हिस मॅनेजमेंटसह अनेक नवीन विषयांत स्पेशलायजेशन करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या परिषदेत कथक मेहता, प्रदीप जोशी, प्रा. लिमये विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले. दीपाली माने, गिरीश अहिरे, प्राजक्ता देशमुख यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. परिषदेसाठी बी. डी. इकडे, एस. ए. गायकवाड, व्ही. एन. भाबड, डी. व्ही. नांद्रे, आर. पगारे, बी. जी. गाडे आदी उपस्थित होते.

मराठा विद्याप्रसारक समाज संस्था संचालित आयएमआरटी व्यवस्थापन महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने रावसाहेब थोरात सभागृहात "व्यवस्थापन शिक्षण : मेक इन इंडिया शाश्वत विकास' विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापनशाखेचे अधिष्ठाता डॉ. इ. बी. खेडकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी संबोधित केले. मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, पंचवटी एमबीए कॉलेजचे संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी, कॉलेजचे संचालक डॉ. बी. बी. रायते, महेश दांडेकर उपस्थित होते.

व्यवस्थापकीय शिक्षण महत्त्वाचे
परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी मविप्र संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सभापती अॅड. नितीन ठाकरे, गोगटे इलक्ट्रो कंपनीचे प्रमुख विवेक गोगटे, कॉलेजचे संचालक डॉ. बी. बी. रायते, एस. एम. डागा यांच्या उपस्थितीत झाले. जागतिकीकरणाच्या युगात व्यवस्थापकीय शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाल्याचे मत व्यक्त या वेळी व्यक्त झाले. अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील शाश्वत विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. रवी आपटे यांनी शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी मांडल्या. बॉश कंपनीचे एचआर विभाग प्रमुख मोहन पाटील, उद्योजक ओमप्रकाश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणाचा विकासप्रक्रियेत महत्त्वाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.