आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मिळणार कोणत्याही क्षणी गॅस सिलिंडर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कॉन्फिडेंस पेट्रोलियम इंडिया लिमिटेड या कंपनीने आपल्या विस्तार योजनेअंतर्गत ‘गो गॅस’ एलपीजी सिलिंडर व्यवसायाची नाशिकमध्ये सुरुवात केली आहे.

ग्राहकाला आवश्यक त्याक्षणी गॅस सिलिंडर मिळण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे कंपनीचे विपणन महाव्यवस्थापक गजानन ठक्कर यांनी सांगितले. एलपीजी सिलिंडर बनविणारा कॉन्फिडेंस हा आशियातील आघाडीचा समूह असल्याचे ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शहरासह ग्रामीण भागातही सेवा उपलब्ध राहणार आली आहे, तसेच डीलरशिपसाठी कंपनीने जाहिरातही दिली असून, त्यांच्या त्वरित नेमणुकाही होतील. ही खासगी कंपनी असून, ग्राहकांना बाजारभावाप्रमाणे सिलिंडर खरेदी करता येईल. देशातील 20 राज्यांमध्ये कंपनीची सेवा आगामी काळात उपलब्ध होणार असून, तामीळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र येथे ती सुरू झाली असल्याचेही ठक्कर यांनी सांगितले.