आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समयसूचक अन् अतार्किक प्रश्नांनी गोंधळ , तलाठी पदाच्या ४१ जागांसाठी १९ हजार परीक्षार्थी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रिओ पॅराऑलिम्पिक २०१६ मध्ये एक दिवसापूर्वीच झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक विजेता मारियप्पन भंगवेलू हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा चालू घडामोडींशी संबंधित इतका ताजा प्रश्न असो की, “ए’ आणि ‘बी’ हे दोघे भाऊ तर सी आणि डी बहिणी अाहेत. ‘ए’चा मुलगा ‘डी’चा भाऊ आहे. तर ‘बी’ आणि ‘सी’चे काय नाते? अशा अतार्किक प्रश्नांनी रविवारी तलाठी परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना गोंधळात टाकले. काठिण्य पातळी वाढल्याने अनेक परीक्षार्थींची कसोटी लागली.

जिल्ह्यातील ४१ तलाठी आणि एक वाहनचालक अशा ४२ पदांसाठी रविवारी (दि. ११) सकाळी ११ ते या वेळेत परीक्षा झाली. २३ हजार ५५३ पैकी १९ हजार २१२ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. शहरातील ६१ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेला हजार ३४१ परीक्षार्थींनी दांडी मारली. म्हणजेच ८१.५७ टक्केच परीक्षार्थींनी परीक्षा दिली. २०० गुणांची परीक्षा बहुपर्यायी होती. जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आस्थापनेवरील तलाठी पेसा क्षेत्र ११ पेसा क्षेत्राबाहेरील ३० अशा ४१ पदांसाठी वाहनचालक पदासाठी सरळसेवा भरतीमार्फत पात्र उमेदवारांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. तलाठी पदांसाठी पेसा क्षेत्राबाहेरील २० हजार ३०३ अर्ज आले होते, तर पेसा क्षेत्रातील हजार २२१ अर्ज प्राप्त झाले होते. वाहनचालकाच्या एका पदासाठी तब्बल ९०८ अर्ज प्राप्त झाले होते. दुपारी ते या वेळेत झालेल्या या परीक्षेसाठी ९०८ पैकी ६८० परीक्षार्थी प्रविष्ट झाले. २२८ परीक्षार्थी गैरहजर होते. म्हणजेच ७४.८८ टक्के परीक्षार्थी हजर होते. पोलिसपाटीलपदाच्या वादग्रस्त भरतीच्या टीकेमुळे जिल्हा प्रशासनाने यंदा मात्र १९०० कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने परीक्षा शांततेत पार पाडली.
बातम्या आणखी आहेत...