आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Confusion Of Ges Subsidy , Latest News, Divya Matahi,

गॅसवरील सबसिडीचा गोंधळ केवळ बँकांमुळेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ऑनलाइन गॅस सबसिडीमुळे वैतागलेल्या ग्राहकांना दिलासा देत पूर्वीप्रमाणे सबसिडीच्या दरातच घरगुती सिलिंडर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, ज्या ग्राहकांनी यापूर्वीच सिलिंडर घेतले आहे; परंतु अद्याप त्यांना सबसिडी मिळाली नाही, त्यांच्या सबसिडीचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत गॅस कंपनीने बँकांनाच दोषी धरले असून, अशा ग्राहकांची प्रकरणे वैयक्तिकरीत्या तपासून निकाली काढणार असल्याचे सांगत बँकांनीच योग्य पद्धतीने लाभ देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
गॅस सबसिडीतील ऑनलाइन बँक खात्याचा संबध गॅस कंपनी अथवा एजन्सीसोबत येत नाही. केवळ आधार लिंकचाच संबंध गॅस एजन्सीशी येतो. परंतु, ग्राहकांना याबाबत माहिती नसल्याने व बँकेकडून खाते क्रमांक गॅस जोडणी क्रमांकाबरोबर योग्य पद्धतीने लिंक न झाल्याने त्याचा तोटा ग्राहकांना सहन करावा लागत आहे. खरेतर सिलिंडर मिळाल्याच्या वेळीच ग्राहकास आगाऊ रक्कम व सबसिडी मिळायला हवी. परंतु, प्रत्यक्षात तसे होत नसल्याने ग्राहक मेटाकुटीस आले आहेत. पूर्वीप्रमाणेच सिलिंडर देण्याचा निर्णय झाला असला तरी आधीची सबसिडी मिळाली नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आहे.
सबसिडी मिळेलच
सबसिडीबाबत ग्राहकांची वैयक्तिक प्रकरणे तपासून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. थेट सिलिंडर देण्याचे आदेश मिळालेले नाहीत. तुषार जगताप, विक्रीकर अधिकारी, बीपीसीएल
ग्राहकांची तक्रार दूर करू
यासंदर्भात पुरवठा विभागाकडून कारवाई होत नाही. पण, ग्राहकांनी तक्रार केल्यास कंपनी व बँकेच्या अधिकार्‍यांकडे देत सोडविल्या जातील. महेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी
लिंक खात्याची माहिती घ्यावी
गॅस कनेक्शन व बँक खाते लिंकिंगची प्रक्रिया बँकेकडून होते तर सबसिडी शासनाकडून मिळते. ग्राहकांनी आपले कुठले खाते लिंक केले याची माहिती घ्यावी. ए. डी. चव्हाण, लिड बँक मॅनेजर
सबसिडी जमा नाही
जानेवारीत 1325 रुपयांना सिलिंडर घेतले होते. त्यानंतर दुसरे सिलिंडर घेतले. परंतु, जानेवारीतील सबसिडी जमा झाली नाही. नीलिमा भंडारी, ग्राहक