आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress And Nationalist Congress News In Marathi, Nashik Lok Sabha Constituncy,Divya Marathi

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस फॅक्टर ठरणार राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद फॅक्टर राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत असून, कॉँग्रेसच्या काही सदस्यांनी नेमके त्याचेच भांडवल करून अस्तित्वाची लढाई असल्याचा संदेश पसरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भविष्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध कॉँग्रेस आमने-सामने असल्यामुळे प्रतिस्पध्र्या बळ कसे द्यायचे, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.
दोन्ही मतदारसंघांत ग्रामीण भागातील सत्ता राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या हातात आहे. नाशिकचा विचार केला तर, नाशिक व सिन्नर या दोन्ही तालुक्यातील पंचायत समितीचे सभापतिपद कॉँग्रेसकडे आहे. विशेष म्हणजे, दोन्ही निवडणुकांत कॉँग्रेसला खर्‍या अर्थाने सत्ता स्थापनेपासून जेरीस राष्ट्रवादीनेच आणल्यामुळे आता या स्थानिक पातळीवरील लढाईचा मुद्दा लोकसभेसाठी पुढे केला जात आहे. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषद निवडणुकीत प्रमुख सामना कॉँग्रेस व राष्ट्रवादीतच राहिला आहे. जिल्ह्याचा विचार केला तर, सर्वाधिक सदस्य राष्ट्रवादीचे असून, जेथे राष्ट्रवादी आहे तेथे कॉँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर राहिली आहे. तसेच जेथे कॉँग्रेसचे उमेदवार विजयी झाले त्यांना विजयासाठी सर्वाधिक झुंज राष्ट्रवादीमुळे द्यावी लागली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निवडणुकीचा संदर्भ देऊन भविष्यात प्रतिस्पध्र्याची ताकद कशासाठी वाढवायची, असा मुद्दा आता प्रचाराच्या केंद्रस्थानी आणला जात आहे.
समझोता एक्सप्रेस..
कॉँग्रेसच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मनधरणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्री चव्हाण यांनी मध्यस्थी केल्यानंतर विकासाच्या मुद्यावर आता राष्ट्रवादीने दोन पावले मागे घेण्याची भूमिका स्वीकारल्याचे चित्र आहे. त्यातून दोन्ही कॉँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना समान निधी मिळेल, असे नियोजन करण्याचे शब्दही दिले गेल्याचे समजते.