आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्ता दिल्यास ‘ते’ महाराष्ट्रही विकून खातील, कॉँग्रेसच्या मेळाव्यात राज ठाकरेंवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘माझ्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा करीन’ असे म्हणणार्‍याच्या हातात खरंच सत्ता गेली तर मिलच्या जागांसह ते संपूर्ण महाराष्ट्र ते विकून खातील’, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व आमदार शरद रणपिसे यांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

कॉँग्रेसच्या वचनपूर्ती मेळाव्यानिमित्त रविवारी नाशकातील कालिदास कलामंदिरात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्षमपणे उपायोजना राबवित आहे. सामाजिक, राजकीय संघटनांकडून मदत होत आहे. तर दुसरीकडे दुष्काळी भागाचे दौरे करण्याच्या नावाखाली विरोधकांकडून केवळ सरकारला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभरात सभा घेणार्‍या नेत्याकडून दुष्काळाचे भांडवल केले जात आहे. या टीकेला जशाच्या तसे उत्तर देण्यासाठी पक्षश्रेष्ठी, विशेषत: मुख्यमंत्र्यांनी सक्रीय झाले पाहिजे. त्यांच्यापाठोपाठ पक्षाचे सर्वच पदाधिकारी विरोधकांवर तुटून पडतील,’ असे ते म्हणाले. सर्वच राजकीय पक्षांमध्ये व्यक्तीगत आरोप करून एकेकाला बाजूला काढण्याचे काम चालू असल्याचे सांगत चव्हाण यांनी आपल्यावरही अन्याय झाल्याची भावना बोलून दाखविली.
दरम्यान, काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने मेळाव्यावर गटबाजीचे सावट होते. शहराध्यक्ष छाजेड यांना हटविण्याची मागणी मेळाव्यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. त्यावर गैरसमज दूर करण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले.