आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Camp At Nashik But No Response Of Candidates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस मेळाव्यावर गटबाजीची छाया; लोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांची पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारने केलेली विविध विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात हाती घेतलेल्या वचनपूर्ती अभियानांतर्गत कार्यकर्ता मेळाव्यास नाशकातूनच प्रारंभ करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमावर शहर काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचे सावट दिसून आले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मेळाव्यास अनुपस्थित पदाधिकार्‍यांची दखल घेत याबाबतीत आपण पक्षर्शेष्ठींसोबत मध्यस्थी करून गैरसमज दूर करून एकसंघ काँग्रेस निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल शहराध्यक्ष आकाश छाजेड यांचे कौतुकही केले. शहर काँग्रेसच्यावतीने रविवारी कालिदास कलामंदिरात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष आमदार शरद रणपिसे होते. कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, उत्तमराव कांबळे, डॉ. हेमलता पाटील, आमदार निर्मला गावित यांच्यासह बहुतांशी पदाधिकारी व नगरसेवकांनी गैरहजर राहून गटबाजीचे दर्शन घडविले. याच पदाधिकार्‍यांनी मात्र मेळाव्यापूर्वी शासकीय विर्शामगृहात चव्हाण यांची भेट घेऊन शहराध्यक्ष छाजेड हटावची मागणी केली.

महापालिकेच्या कारभारावर टीका
केंद्रातील काँग्रेस सरकारने नेहरू पुनरुत्थान योजनेंतर्गत झोपडपट्टी निर्मूलनासाठी नाशिक महापालिकेत विरोधी मनसेची सत्ता असली तरी कुठलाही भेदभाव न करता 1100 कोटी रुपये दिले. त्याच प्रमाणात नांदेड महापालिकेलाही निधी दिला असताना तिकडे 10 हजार लोकांना घरांच्या चाव्या देण्यात येत आहेत. मात्र, नाशिक पालिकेला ते कसे जमले नाही, असा प्रश्न उपस्थित करून पालिकेच्या कारभारावर टीका केली.