आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Corporators Against Municipal Corporation Commissioner

काँग्रेस नगरसेवक आयुक्तांविराेधात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकीकडे आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे कारण देत नगरसेवकांच्या मूलभूत कामांना ब्रेक लावला जात असताना, दुसरीकडे मात्र तब्बल दहा वर्षांपर्यंतच्या दीर्घ मुदतीचे काेट्यवधी रुपयांची कंत्राटे काढण्याच्या प्रक्रियेविराेधात काँग्रेस नगरसेवकांनी दंड थाेपटले आहेत.

पालिका आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करीत नगरसेवकांची चहुबाजूने कोंडी करण्याचा डाव कशासाठी, असाही सवाल केला आहे. महासभेत याविराेधात काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक हाेणार असून, हे घातक िनयाेजन रद्द करण्यासाठी नागरिकांनीही साथ द्यावी, असे आवाहन काँग्रेसचे पालिका गटनेते उत्तम कांबळे यांनी केले. साेमवारी महासभा हाेणार असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेस नगरसेवकांची बैठक कांबळे यांनी घेतली. बैठकीत काेट्यवधीच्या कंत्राटांबाबत सवाल करीत काँग्रेसने कठाेर भूमिका घ्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यानंतर कांबळेंनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले की, यातील सर्व कामे प्रशासनाची असल्याने कंत्राटीकरणास काेण उत्सुक आहे, हे यातून स्पष्ट हाेत आहे, असा टाेला आयुक्तांना लगावला.

बाहेरच्या कंत्राटदारांसाठी डाव
काेट्यवधीचीमाेठी कंत्राटे मंजूर करण्यामागे बाह्य कंत्राटदारांना पाेसण्याचा डाव असल्याचा संशय आहे. -वत्सला खैरे, शहराध्यक्ष,महिला काँग्रेस

मुख्यमंत्र्यांचे मित्र म्हणून काहीही चालेल का?
मुख्यमंत्रीफडणवीसांनी नाशिकमध्ये काही महिन्यांपूर्वी ‘आयुक्तपदावर प्रवीण ही आपली चॉइस असल्याचे’ जाहीर सांगितले हाेते. त्यानंतर नागपूर कनेक्शनमुळे मुख्यमंत्री आयुक्त मैत्रीचे किस्से सांगितले जात हाेते, याकडे लक्ष वेधत कांबळेंनी मुख्यमंत्र्यांचे मित्र असले म्हणून काहीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा िदला. पाेलिस आयुक्तपदावरून सरंगलांसारख्या चांगल्या अधिका-याची बदली हाेण्यास हेच आयुक्त कारण असल्याचे बाेलले जाते, ही बाब दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.

धाेरण अस्पष्ट
पाणीपट्टीवाढवून नागरिकांवर बाेजा टाकायचा दुसरीकडे कंत्राटदारांना दीर्घ मुदतीची कामे द्यायची हे धाेरण स्पष्ट हाेत आहे. आकाशछाजेड, नगरसेवक

एकाधिकारशाही
माेठीकंत्राटे मंजूर करण्याची बाब म्हणजे आयुक्तांची एकाधिकारशाही आहे. काँग्रेसचे नगरसेवक त्यास महासभेत विराेध करतील. कामे मंजूर झाली तर रस्त्यावरही उतरतील. - शरद आहेर, शहराध्यक्ष,काँग्रेस