आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leader And Mayor Controversy Issue At Nashik

महापौरांवर ‘निधी’तून तीर, राज यांच्या स्वप्नाला सुरुंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- काँग्रेसचे माजी गटनेते लक्ष्मण जायभावे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यातील शाब्दिक वाद धुमसण्यामागे महापोरांची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप करीत शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी सत्ताधारी मनसेवर शरसंधान केले. महासभेत ५० लाखांचा निधी देण्याचा शब्द महापोरांनी दिला असताना, त्याची पूर्ती करण्याची जबाबदारीही त्यांचीच होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता नगरसेवकांना प्रशासनाची दरवाजे ठोठावण्याची वेळ आल्याचाही टोला त्यांनी लगावला. दरम्यान, नगरसेवक निधीच्या मुद्यावरून सत्ताधारी मनसेला कोंडीत पकडण्याचा शिवसेनेचा यामागे प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

नगरसेवक निधी ५० लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय झाल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे नगरसेवकांची अस्वस्थता वाढत आहे. त्यातूनच जायभावे आयुक्तांमध्ये जोरदार वाद झाल्यानंतर आता त्यात शिवसेनेने उडी घेतली आहे.
बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सभागृहाचे पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी ५० लाख निधी देण्याबाबत दिलेला शब्द पाळणे गरजेचे आहे. हातात वेळ कमी असल्यामुळे त्यांनीच नगरसेवक निधीतून कोणती कामे घ्यायची, याबाबत नगरसेवकांचे नेतृत्व करण्याची गरज होती. दुर्दैवाने तसे झाल्यामुळे आता लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन भडका उडाला असून, त्यात नगरसेवकांनाच बदनाम करण्याचे प्रकार सुरू झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

विरोधी पक्ष करेल काम : सत्ताधाऱ्यांनाप्रशासनाकडून काम करून घेता येत नसेल तर त्यांनी तसे सांगावे. विरोधी पक्ष सत्ताधारी नगरसेवकांचीही कामे मार्गी लावून दाखवेल, असे आव्हानही बोरस्ते यांनी दिले.

-नगरसेवक निधीबाबत आयुक्तांबरोबर दोन-तीन दिवसांत बैठक घेणार असून, या बैठकीत त्यावर तोडगा काढला जाईल. सर्वांची कामे मार्गी लावले जातील. अशोकमुर्तडक, महापोर
महापालिकेत मनसेची सत्ता असताना राज ठाकरे यांच्या ‘बगिच्यांचे शहर’ या स्वप्नाला सुरुंग लावला जात आहे. आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही शिवसेनेने आंदोलनाची जबाबदारी घ्यायची का, असा सवालही त्यांनी केला. शहरातील ४७७ उद्यानांच्या दुरुस्तीची कंत्राटे डिसेंबरमध्ये संपली. अनेक उद्याने पाण्याअभावी निस्तेज होत आहेत. अशा स्थितीत बगिच्यांऐवजी भकास शहराची निर्मिती होईल, असा टोलाही लगावला. साधा उद्यानांबाबत निर्णय घेता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.