आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाेटबंदी विराेधात अाज काँग्रेसचा अाक्राेश मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बँकांना रविवारची सुटी असल्याने नागरिकांची मदार प्रामुख्याने केवळ एटीएमवरच हाेती. मात्र, महानगरातील बहुतांश एटीएममध्ये रक्कमच नसल्याने नागरिकांना रविवारी रिकाम्या हातानेच परतावे लागले. ज्या दाेन - तीन एटीएममध्ये काही प्रमाणात रक्कम शिल्लक हाेती, ती पण दुपारच्या अातच संपुष्टात अाल्याने नागरिकांची वणवण झाली. अनेक ठिकाणी फिरूनदेखील दुपारनंतर नागरिकांना पैसे मिळाले नाहीत.
महानगरातील बहुतांश एटीएमचे शटर्स रविवारी बंदच असल्याने नागरिकांना सुरू असणारे एटीएम शाेधण्यासाठी खूप यातायात करावी लागली. दहा -बारा एटीएम धुंडाळल्यानंतर कुठले तरी एखादे एटीएम सुरू मिळत हाेते. परंतु, मग अशा एटीएमबाहेर रांगा लागल्याने अल्पकाळात उर्वरित.पान
पंतप्रधाननरेंद्र माेदी यांनी पाचशे, हजारच्या नाेटा चलनातून रद्द केल्याचा निर्णय सर्वसामान्य जनता तसेच व्यापारी, शेतकरी, मजुरांसह सर्वच घटकांना त्रासदायक ठरणारा असून, या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने साेमवारी (दि. २८) ग्रामीण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मदतीने अाक्राेश माेर्चा काढण्यात येणार अाहे. काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीसह माकप, भाकप, शेतकरी कामगार पक्षांसह समविचारी पक्षांनाही माेर्चात सहभागी हाेण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.

केंद्रातील भाजप सरकारच्या नाेटबंदीच्या निर्णयाविराेधात देशभरात काँग्रेसने साेमवारी अाक्राेश माेर्चा काढण्याचे अावाहन केले अाहे. नाशिक जिल्हा शहर काँग्रेसतर्फ अाक्राेश माेर्चाचे नियाेजन केले अाहे. यासंदर्भात शहराध्यक्ष शरद अाहेर यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन माेर्चात शहरासह मालेगाव, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर अाक्राेश करण्यात येणार असल्याचे सांगितले. माेदींचा निर्णय काळा पैसा दडपविणाऱ्यांविराेधात असल्याचे दाखविले जात असले तरी प्रत्यक्षपणे बँका,
एटीएमच्या समाेर उभ्या रांगांमध्ये एकही उद्याेजक, व्यापारी, धनदांडगे दिसून येत नाही. याउलट सर्वसामान्य कुटुंबीय, महिला, वृद्ध रांगेत दिसत असून, निष्पाप ७० लाेकांचे बळी गेले अाहेत. यास केवळ भाजप सरकारचे चुकीचे निर्णय कारणीभूत असून, कुठलेही नियाेजन नसताना जनतेवर लादलेला हा निर्णय जाचक अटी मागे घेण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून अाक्राेश करणार असल्याचे सांगण्यात अाले. या माेर्चाचे नेतृत्व मालेगावचे अामदार अासिफ शेख, इगतपुरीचे अामदार निर्मला गावित, माजी मंत्री डाॅ. शाेभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील, माजी अामदार रशीद शेख, शाहू खैरे अादी करणार अाहेत. या माेर्चात युवक काँग्रेस, सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, अण्णा पाटील, वत्सला खैरे, रमेश जाधव, मीरा साबळे, पांडुरंग बाेडके अादी सहभागी हाेणार अाहेत.

राष्ट्रवादीचा पाठिंबा
^काँग्रेसच्या अाक्राेश माेर्चात सहभागी हाेण्यासाठी डाॅक्टर, वकील, व्यापारी, दुकानदारांसह राष्ट्रवादीसह इतर समविचारी पक्षांना साेबत घेण्यासाठी चर्चा करण्यात अाली अाहे. त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी हाेणार असून, जनतेत निर्माण झालेला असंताेष माेर्चातून प्रकट हाेईल. -शरद अाहेर, शहराध्यक्ष

माेर्चाचा मार्ग असा
काँग्रेस कार्यालयापासून सांगली बँक सिग्नलवरून एकेरी मार्गातून रविवार कारंजाकडे माेर्चा जाऊन तेथून धुमाळ पाॅइंट, गाडगे महाराज पुतळा, शालिमार चाैक, डाॅ. अांबेडकर पुतळामार्गे सीबीएसवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चाचा समाराेप हाेणार अाहे. दुपारी १२ वाजता माेर्चास प्रारंभ हाेणार असून, सुमारे ते हजार कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता शहराध्यक्षांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...