आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिंडोरी नगरपंचायतीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्यानंतर जल्लाेष करताना उमेदवारांसह माजी अामदार रामदास चाराेस्कर, माधवराव साळुंखे, विश्वास देशमुख, तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे अादी.
दिंडोरी - नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सर्वाधिक १० जागा मिळवित सत्ता संपादन केली, तर शिवसेना २, भाजप १, मनसे १, अपक्षांना तीन जागांवर समाधान मानावे लागले. नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना सत्ता स्थापन करण्याइतपत जागा मिळविता आल्या, तर शिवसेना भाजपची युती फिसकटल्याने त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना केवळ एक, दोनच जागा मिळविता आल्या.
अनेकांना स्वपक्षीयांनी उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली. त्यामुळे ४० अपक्षांनी निवडणूक लढविली, यातील तिघांनाच विजय मिळविता आला. अपक्षांच्या उमेदवारीने मतांचे विभाजन होऊन अनेक पक्षीय उमेदवारांना पराभवाचे धनी व्हावे लागले. विशेष म्हणजे दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतानाही त्यांना जागांवर समाधान मानावे लागले.
बातम्या आणखी आहेत...