आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इच्छुकांना आघाडीच्या जागावाटपाची प्रतीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -विधानसभानिवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी निश्चित मानली जात असली, तरी दोन्ही पक्षांतील जागावाटप जागांच्या फेरबदलावर शिक्कामोर्तब होत नसल्याने अनेक इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. आघाडीचा तिढा सुटण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या बहुतांश इच्छुकांचा विरोध पक्षातला प्रवेश सोहळा अडचणीत सापडला आहे. आघाडीकडून जागा सुटणार नसल्याचे खापर फोडत पक्षांतराची घाई झालेले पदाधिकारी कुंपणावर अडकले आहेत.
विधानसभा निवडणुकांची घोषणा येत्या दोन ते तीन दिवसांत होण्याची शक्यता असून, त्यानंतरच खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापू लागणार आहे . गेल्या काहीदिवसांपासून राजकीय पक्षांमध्ये दलबदलाच्या मोहिमेला वेग आला आहे . यामध्ये केंद्रातील भाजप सरकारप्रमाणेच राज्यातही महायुतीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविली जात आहे . या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपात प्रवेश करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. मात्र, तिकिटाची खात्री मिळत नसल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी िनश्चित मानली जात असली, तरी दररोर आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरूच आहेत. त्यामुळे जागावाटप फेरबदलावर कुठलीही चर्चा अद्याप होत नसल्याने इच्छुकांना तयारीला वेळ मिळत नसल्याचे बोलले जात आहे. अाघाडीचे जागावाटप िनश्चित झाल्यास काँग्रेसकडून इच्छुक असणाऱ्यांची जागा जर एेनवेळी राष्ट्रवादीला सुटली तर पंचाइत होऊ शकते, या भीतीने लवकरात लवकर आघाडीचा पेच सुटला पाहिजे, यासाठी इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींना साकडे घातले जात अाहे. दरम्यान, ज्या मतदारसंघात विद्यमान आमदारालाच पक्षाचे अधिकृत तिकीट मिळणार हेनिश्चित असले, तरी त्याच आमदाराकडून ऐनवेळी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी चालविली जात असल्याने पक्षाचे पदाधिकारी आणि त्याच्या विरोधकांमध्ये अस्वस्थत पिर्माण झाली आहे. या जागेवर दावा सांगायचा तरी कसा, असा प्रश्नदेखील पक्षातीलच इतर इच्छुकांना पडला आहे .
इच्छुकांचा प्रवेश पडततोयय लांबणीवर
शहरिजल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील अनेक लोकप्रतिनिधी पदाधिकारी पक्षांतराच्या तयारीत असले, तरी त्यांना हमखास तिकिटाचा शब्द मिळत नसल्याने त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडतोय. सर्वाधिक इच्छुक असलेल्या नाशिक पूर्व, मध्य, देवळाली, तसेच सिन्नर, चांदवड, नांदगाव, येवला, बागलाणमध्ये अशी स्थिती दिसून येत आहे.