आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Party Loses Credite, Say MNS Chief Raj Thakare

कॉँग्रेस पत गेलेल्यांचा पक्ष, मदरशांबाबतच्या निर्णयावर राज ठाकरे यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अल्पसंख्याकांना आमिषे दाखवायची आणि मतांचे राजकारण करायचे हा कॉँग्रेसचा जुनाच फंडा आहे. त्यात नवीन असे काहीही नाही. समाज आज त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. कॉँग्रेस म्हणजे पत गेलेल्यांचा पक्ष आहे’, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कॉँग्रेसचा समाचार घेतला.
राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राज म्हणाले की, कॉँग्रेसवर पक्ष केवळ मते टिकवण्यासाठी अल्पसंख्याक समाजाला जवळ करत दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते, मात्र यापुढे कोणत्याही समाजातील नागरिक त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.

मनसेच्या आंदोलनानंतर नाशिक जिल्ह्यातील टोल प्रकल्पांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने 4 सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. याबाबत विचारले असता राज म्हणाले की, टोल नाक्यांच्या कारभाराविषयी न्यायालयात दावा दाखल केला आहे. मात्र, अजूनही ही केस बोर्डावर आलेली नाही. त्यामुळे याबाबत ‘कंटेम्प्ट ऑफ कोर्ट’ झाला तरी काही फरक पडत नाही. न्यायालयाने न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा.