नाशिक - एकीकडे काँग्रेसचे नेते दुष्काळ लाेकांशी निगडित अन्य मुद्यांवर अाक्रमक हाेत असताना शहर पातळीवर किंबहुना महापालिकेच्या माध्यमातून प्रभावी कामगिरी हाेत नसल्याची तक्रार थेट प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांच्याकडेच करण्याची तयारी एक गटाने सुरू केली अाहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर येण्याची शक्यता अाहे. महापालिकेत सत्ताधारी मनसे राष्ट्रवादीला मदत केल्यानंतर पदरात पडलेली अपमानास्पद वागणूक त्याविराेधात ठाेस भूमिका घेण्यात पदाधिकाऱ्यांना अालेले अपयश याची कैफियत प्रदेशाध्यक्षांकडे मांडली जाणार असल्याचे समजते.
केंद्र राज्यात काँग्रेसची सत्ता असतानाही स्थानिक पातळीवरील गटबाजी थांबलेली नव्हती. त्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी विविध प्रयाेग करून बघितले. मध्यंतरी शहराध्यक्ष अाकाश छाजेड यांच्याविराेधात एका गटाने माेर्चेबांधणी करून शहर काँग्रेसमधील छाजेड गटाला संपुष्टात अाणण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर कायमस्वरूपी शहराध्यक्ष म्हणून काँग्रेसला काेणत्याही एका व्यक्तीला ठाेसपणे स्थान देता अाले नाही. परिणामी, प्रभारी शहराध्यक्षाच्या रूपात शरद अाहेर यांच्याकडे नेतृत्व दिले गेले. कालांतराने त्यांनाही गटबाजीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र अाहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत लाेकांशी निगडित कामांबाबत पदाधिकारी फारसे अाक्रमक नसल्याचे कारण देत, फेरबदलासाठी एका गटाकडून चव्हाण यांना साकडे घालण्याची तयारी सुरू झाल्याचे समजते. कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीत भाविकांच्या झालेल्या अडवणुकीबाबत निवेदन देण्यापलीकडे काँग्रेसकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. याउलट राष्ट्रवादीने अाक्रमक भूमिका घेत बाजी मारल्याचीही बाब प्रदेशाध्यक्षांच्या निदर्शनास अाणून दिली जाणार अाहे. महापालिकेत मनसे राष्ट्रवादीला मदत केल्यानंतरही काँग्रेसला माेठे पद मिळालेले नाही. किमान, महिला बालकल्याण समितीचे सभापतिपद तरी काँग्रेसकडे यावे, यासाठीही प्रयत्न हाेत नसल्याचे लक्षात अाणून दिले जाणार अाहे.
प्रदेशाध्यक्षांचा दाैरा
दीड वर्षावर अालेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा प्रभाव वाढवण्याची गरज असून, त्यासाठी गटनेतेपदासाठी लाॅबिंग हाेण्याची चिन्हे अाहेत. सध्या उत्तम कांबळे यांच्याकडे गटनेतेपद असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पूर्ण वेळ देणे अशक्य बनले अाहे. या पार्श्वभूमीवर उद्धव निमसे, अाकाश छाजेड, शिवाजी गांगुर्डे, अश्विनी बाेरस्ते यांची नावे चर्चेत अाली अाहेत.