आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसी निष्ठावंतांना एकत्र येण्याची हाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काँग्रेसपदाधिकाऱ्यांमधील मरगळ दूर करून पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी शहर जिल्हाध्यक्ष फेरबदलाचे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या निष्ठावंतांना एकत्र करून संघटना बळकटीसाठी काही माजी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले अाहेत. यात पांडुरंग बाेडके, नदीम शेख यांनी पुढाकार घेतला असून, पहिल्याच बैठकीस ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
सत्ताधाऱ्यां विराेधात अांदाेलने केली जात नाहीत. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी कार्यक्रमांनाही प्रभारी अध्यक्षांसह माेजकेच अाठ-दहा लाेक उपस्थित राहत असल्याचे चित्र दिसून येत अाहे. शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सरकारच्या धाेरणांविराेधात अांदाेलनाची गरज असताना दुर्लक्ष केले जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप अाहे.

पक्षात राष्ट्रीय पातळीपासून युवा पिढीला संधी देण्यासाठी जाेरदार हालचाली सुरू अाहेत. यासाठी प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत भेटी घेत फेरबदलाची तयारी सुरू केली अाहे. त्याचा अाधार घेत बऱ्याच काळापासून संघटनात्मक कामापासून दूर राहिलेल्या निष्ठावंतांना एकत्र करण्याचे काम काही माजी पदाधिकाऱ्यांनी हाती घेतले अाहे. पांडुरंग बाेडके, नदीम शेख, राजेंद्र बागुल, चंद्रकांत साेनार, अशाेक लहामगे यांनी त्यात पुढाकार घेतला अाहे. ४० हून अधिक जुन्या-ज्येष्ठ कार्यकर्त्यांना भेटून त्यांना पक्षकार्यात सक्रिय हाेण्याचे साकडे घालण्यात अाले.

यासाठी एका हाॅटेलमध्ये बैठक घेऊन ‘कूट’नीती ठरविण्यात अाली. यावेळी शहराध्यक्षपदासाठी काेणाच्या नावाचे समर्थन वा विराेधाची भूमिका घेता निवड करताना प्रदेश निरीक्षक असाे की प्रदेशाध्यक्ष, निष्ठावंतांशी चर्चा करूनच निर्णय घेतला पाहिजे, असा अाग्रह धरण्यात अाला. लवकरच शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना एकत्रित केले जाणार असल्याचे बाेडके यांनी सांगितले. नागरिकांशी निगडित प्रश्नांवर अांदाेलने करण्याचा निर्णयही घेण्यात अाला. कृष्णा नागरे, संताेषकुमार लाेळगे, रमेश बागुल, देवराम सैंदाणे, संजय पितळे अादींसह कार्यकर्ते उपस्थित हाेते.