आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तातडीने अाघाडी करा, अन्यथा काँग्रेसला बंडखाेरीचा धाेका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात भाजप अाणि शिवसेनेचे वाढते प्रस्थ बघता काँग्रेसींनी अाता सावध भूमिका घेतली असून, पक्षनिरीक्षकांसमाेर झालेल्या बैठकीत काँग्रेस - राष्ट्रवादीची अाघाडी करण्याची अाग्रही मागणी केली. अाघाडीची घाेषणा तातडीने केल्यास एेनवेळी संभावित नाराजी टाळता येईल, असेही यावेळी सांगण्यात अाले. अाघाडीच्या सत्ताकाळात शहरात अनेक कामे झाली असून, त्या कामांचा ऊहापाेह प्रचारात करण्याचा सल्ला यावेळी निरीक्षक राजू वाघमारे यांनी दिला.
काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत अाजी-माजी नगरसेवकांनी विचार व्यक्त केले. थेट पाइपलाइन, फाळके स्मारक, बुद्ध स्मारक, उड्डाणपूल, जाेड पूल, रिंगराेड, गाेदाघाट सुधारणा, तरणतलाव ही कामे अाघाडी सरकारच्याच काळात झाली असून, त्याची जाणीव नाशिककरांना पुन्हा एकदा करून देण्याची वेळ अाल्याचे यावेळी सांगण्यात अाले. शिवसेना, भाजप मनसेच्या सत्ताकाळात मात्र शहराची वाट लागल्याचा अाराेप करताना जकात एलबीटीचे उत्पन्न संबंधितांच्या सत्ताकाळातच हातचे गेल्याने पालिका अार्थिकदृष्ट्या दुर्बल झाली. त्यामुळे शहरात नवीन विकासकामे झाली नाहीत. जी कामे झालीत ती सिंहस्थामुळे झाली अाहेत. पालिका शाळांचीही अत्यंत वाईट स्थिती अाहे. त्यामुळे या सर्व बाबींचा ऊहापाेह प्रचारात करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात अाले. पक्षांतर्गत बंडखाेरीला किमान निवडणुकीपुरता तरी ब्रेक देण्याचा सल्ला काही ज्येष्ठांनी या बैठकीत दिल्याचे समजते. यावेळी वाघमारे यांनी निवडणुकीत एकाेपा राखण्याची सूचना देत शिवसेना, भाजपने शहराचे नुकसान कसे केले हे मतदारांना पटवून द्या, असे अावाहन केले.

पक्षाच्या वतीने निवडून येतील अशा सक्षम उमेदवारांच्या सल्ल्यानेच तिकिटे देण्यात यावीत, असेही यावेळी सांगण्यात अाले. चार वाॅर्डांचा एक प्रभाग हाेणार असल्याने निवडणूक जिकिरीची हाेणार अाहे. त्यामुळे सक्षम उमेदवारांना उभे करणे गरजेचे अाहे. निवडून येण्याची खात्री असलेल्या उमेदवाराच्या मतानुसार अन्य उमेदवारांची निश्चिती झाल्यास विराेधकांना टक्कर दिली जाऊ शकते, असेही यावेळी नमूद करण्यात अाले. प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर तातडीने अाघाडीची घाेषणा झाल्यास ही बाब इच्छुकांसाठी दिशादर्शक ठरेल. निवडणुकीच्या ताेंडावर अाघाडीची घाेषणा झाल्यास त्यातून नाराजी वाढून बंडखाेरी हाेण्याची दाट शक्यता यावेळी सदस्यांनी निरीक्षकांसमाेर व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...