आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याच्या कडेला कचरा, बांधकाम साहित्याचे ढिगारे; अधिकाऱ्यांचे दंडात्मक कारवाईचे नगारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील रस्त्यांलगत  टाकल्या जाणाऱ्या कचरा अाणि बांधकामाच्या निकामी ढिगाऱ्यांचा प्रश्न वारंवार पुढे येऊनदेखील त्यावर ठोस उपाय पालिकेकडून हाेत नाही. चोपडा लॉन्स, कॅनाॅलरोड, त्र्यंबकरोड अशा अनेक रस्त्यांलगत या समस्येचे ग्रहण लागल्याने स्थानिक अाणि वाहनचालक पुरते वैतागले आहेत.
 
बांधकामाच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने खास व्यवस्था केली अाहे. रस्त्याच्या कडेला पडलेले ढिगारे उचलून नेण्यासाठी ठेका देण्यात अाला असतानाही हेे ढिगारे जैसे थे अाहेत. या प्रकरण डी. बी. स्टारच्या माध्यमातून अधाेेरेखित करण्याचा प्रयत्न...
 
शहरात चोपडा लॉन्स, कॅनाॅलरोड, त्र्यंबकरोड अशा अनेक रस्त्यांच्या कडांना कचरा वा बांधकामाच्या ना गेल्या काही महिन्यांपासून या समस्येचे ग्रहण लागले असल्याने स्थानिक रहिवाशांसह वाहनधारक वैतागले आहेत. बांधकामाच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने खास व्यवस्था करण्यात अाली अाहे. रस्त्याच्या कडेला पडलेले ढिगारे उचलून नेण्यासाठी ठेका देण्यात अाला असतानाही रस्त्याच्या कडा ढिगाऱ्यांनी भरलेल्या अाहेत.
 
नववसाहतींलगतच्या रस्त्यांसह काही रिंगरोड, कॉलनीअंतर्गत रस्त्यांची बांधकामाच्या कचऱ्याच्या समस्येने वाट लागली आहे. अनेक ठिकाणी हा कचरा  टाकण्यासाठी येणारी लहान-मोठी वाहने ही घाण रस्त्याने पाडत येतात, तसेच अनेकदा कारवाईच्या भीतीने रस्त्याच्या कडेलाच बांधकामाच्या कचऱ्याचे  ढिगारे टाकले जात असल्याने त्याचा धुरळा परिसरात पसरतो. बांधकामाच्या कचऱ्यामध्ये काँक्रीटचे ब्लॉक्स, गवत, सिमेंटच्या गोण्या, प्लास्टिक, जुनी कापड असे साहित्य असल्याने, पावसाळ्यात रोगराई पसरण्याची भीती आहे. याशिवाय महापालिकेने रस्त्याच्याकडेला लावलेली झाडेदेखील या वाहनांमुळे भुईसपाट झाली आहेत.

त्र्यंबकराेडला पाणी निचऱ्याचे खड्डे बुजले
त्र्यंबकराेडवरील म्हाडा काॅलनीच्या समाेर असलेल्या माेकळ्या जागेवर सर्रास बांधकामाचा कचरा  टाकला जात अाहे. त्यामुळे रस्त्याच्या दाेन्ही बाजूला पाण्याचा निचरा  हाेण्यासाठी असलेल्या खाेलगट जागेतील खड्डे भरले जात असून त्याचा फायदा अतिक्रमण करणाऱ्यांसाठी हाेत अाहे. रस्त्यालगत असलेले खड्डे बांधकामाच्या कचऱ्यामुळे अायतेच बुजविले जात असल्याने त्र्यंबकराेडला सध्या अतिक्रमणाचा माेठा विळखा बसत अाहे.
 
चाेपडा लाॅन्स ते हनुमानवाडी ढिगारेच
चाेपडा लाॅन्स ते हनुमानवाडी व रामवाडीकडे जाणारा रस्ता तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हाॅटेल ग्रीन व्ह्यूच्या पाठीमागील माेकळ्या जागेतही सर्रास बांधकाम मलब्याचे ढिगारे  टाकण्याचे उद्याेग सुरू अाहेत. विशेष म्हणजे त्यातील काही वाहनांवर महापालिका सेवार्थ असे फलकही लावलेले असतात. त्यामुळे गांभीर्य अधिक तीव्र हाेते.

कॅनाॅलरोडवर बांधकामाच्या कचऱ्याचे ढिगारे
पाइपलाइनरोड ते मोतीवाला कॉलेजदरम्यान असलेला कॅनाॅलरोडला सर्वदूर बांधकाम कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी व्यापले आहे. स्थानिक बांधकाम व्यावसायिक त्यांच्या प्रकल्पातील सर्व घाण रस्त्याच्या कडेला आणून टाकत अाहेत. विशेष म्हणजे महापालिकेची डोळेझाक या समस्येला बळकटीच देत अाहे. स्थानिक रहिवाशांनी पोलिसांसह नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनदेखील मातीमिश्रित कचरा टाकणाऱ्या संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे एकूणच या सर्व प्रकाराविषयी संशय व्यक्त केला जाताेय.  विस्डम हायस्कूलकडील वळण, ईश्वर प्रेस्टिज, खांदवेनगरकडील वळणरस्ता, तसेच पाण्याची टाकी अशा सर्वच भागांत मोठ्या प्रमाणावर हे ढिगारे टाकले जात आहेत.
 
अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची सूचना
कोणत्याही व्यक्तीने रस्त्याच्या कडेला घाण टाकू नये. खरेतर नागरिकांनीच यासंदर्भात काळजी घेतली पाहिजे. पण तरीही तसे होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हयगय केली जाणार नाही. पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना सांगून दोषींविरुद्ध तातडीने दंडात्मक कारवाईची करण्याची सूचना करण्यात अाली आहे.
- संतोष गायकवाड, नगरसेवक
 
बातम्या आणखी आहेत...