आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीडीअार करारपत्रानंतरच मिळणार बांधकाम परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मनाला वाटेल तशा फायलींचा अार्किटेक्टद्वारे हाताेहात हाेणारा प्रवास थांबवण्याबराेबरच नगररचना विभागातील विशिष्ट व्यक्तींसाेबत चर्चेत असलेली युतीही अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी उद्ध्वस्त करण्यासाठी डिसेंबरपासून बांधकाम परवानगीचे नवीन धाेरण लागू करण्याचा निर्णय घेतला अाहे. कार्यालयीन प्रती मंजूर झाली म्हणून बांधकाम परवानगी टीडीअार वापरण्यास मंजुरी मिळाल्याचा ग्रह माेडीत काढला जाणार असून, बांधकाम परवानगीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर गरज असेल तर टीडीअार करारपत्र घेतल्यावरच बांधकाम परवानगी दिली जाणार अाहे.
महापालिकेची सूत्रे स्वीकारल्यानंतर कृष्णा यांनी माजी अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्यापुढे पाऊल टाकत समस्यांमध्येच गुंतून राहता प्रश्नांवर उत्तर शाेधणे सुरू केले अाहे. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून अाता बांधकाम परवानगीची प्रक्रिया सुरळीत केली जाणार अाहे.

बांधकाम परवानगीसाठी अर्ज अाल्यानंतर छाननी करून क्षेत्रानुसार किती चटईक्षेत्र (एफएसअाय) बांधकाम करता येईल, हे सांगितले जाईल. तितका एफएसअाय अर्जदाराकडे असेल तर ठीक, अन्यथा त्यास किती टीडीअारद्वारे एफएसअाय मंजूर हाेईल हे कळवले जाईल. त्यानंतर संबंधिताने ज्यांच्याकडून टीडीअार घेणार अाहे, त्यासाेबतचा करारनामा महापालिकेला देणे अपेक्षित अाहे. हा करारनामा (अॅग्रिमेंट) प्राप्त झाल्यानंतर मात्र महापालिकेचा नगररचना विभाग पुन्हा छाननी करून कार्यालयीन प्रत मंजूर करेल. कार्यालयीन प्रत प्रथम प्रत ( एफएसी) अर्जदाराला एकाचवेळी जाणार अाहे.

अार्किटेक्टकडून हाताेहात प्रकरणांचा प्रवास हाेत हाेता. मूळ अर्जदाराला फारशी माहिती नव्हती. त्यामुळेच नवीन टीडीअार धाेरण लागू झाल्यानंतर जुन्या धाेरणाशी संबंधित कार्यालयीन प्रतीद्वारे टीडीअार मिळवण्यासाठी संघर्ष हाेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मागील काळात टीडीअार धाेरण लागू झाल्यानंतर जवळपास अडीचशे प्रकरणे अडचणीत अाली. या प्रकरणात बांधकाम परवानगीसाठी दाखल अर्जाबाबत कार्यालयीन प्रत मंजूर झाल्यानंतर टीडीअारची अनुमतीही मिळाली, असा अर्थ काढला गेला. मात्र, टीडीअारबाबत जाेपर्यंत करारपत्र नसेल ताेपर्यंत संबंधितांना टीडीअार कसा मंजूर करायचा, असा महापालिकेसमाेर पेच अाहे. कार्यालयीन प्रत म्हणजे टीडीअार परवानगी हाेत नाही. विविध अाक्षेप वा पूर्ततेसाठी कार्यालयीन प्रत महत्त्वाची असते. टीडीअारसाठी खरेदीदार विक्रेता यांच्यातील करारपत्र महत्त्वाचे असून, संबंधित प्रकरणात उभयतांतील करारपत्र नसल्यामुळे अडचण असल्याचे अायुक्तांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर काेणाचीही गैरसाेय नकाे म्हणून या प्रकरणाबाबत नगररचना विभागाच्या प्रधान सचिवांकडे मार्गदर्शन मागवण्यात अाले अाहे.

सुलभ परवानगीचा आमचा प्रयत्न
^बांधकाम परवानगी,पूर्णत्वाचा दाखला सहज देण्यासाठी अाॅटाे डीसीअार सुरू हाेणार अाहे. तत्पूर्वी डिसेंबरपासून टीडीअार करारपत्र दिल्यानंतरच बांधकाम परवानगी दिली जाईल. कार्यालयीन प्रतीवर अाक्षेपाची परिपूर्ती झाल्यावरच बांधकाम परवानगी दिली जाईल. -अभिषेक कृष्णा, अायुक्त, महापालिका
बातम्या आणखी आहेत...