आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरालगत रेडीरेकनर दरात वाढ करण्याची क्रेडाईची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातीलबाजार दरतक्त्याचे (रेडीरेकनर) दर 2015 मध्ये वाढविता ते 2014 प्रमाणेच कायम ठेवावेत, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई नाशिकने केली आहे. मात्र ही मागणी करतानाच या दरात समतोल साधण्यासाठी शहरालगतच्या काही परिसरासह जिल्ह्यातील काही भागात मात्र दरवाढ 20 ते 60 टक्के करण्याची मागणीही क्रेडाईने राज्याचे नोंदणी मुद्रांक आयुक्त श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.
2014 मध्ये शहर लगतच्या विकसित हाेत असलेल्या परिसरातील संपत्तीच्या बाजार मूल्यतक्त्यात (रेडीरेकनर) राज्य शासनाने मोठी दरवाढ केली हाेती. ही दरवाढ बहुतांश भागात अवास्तव असल्याचा फटका शहरातील रिअल इस्टेट क्षेत्राला बसला, तसाच ताे शासनाच्या महसुलासही बसल्याचे समाेर अाले अाहे. याच अनुषंगाने क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी मुद्रांक अायुक्तांची नुकतीच भेट घेत मागील वर्षाचेच दर कायम ठेवण्याची मागणी केली हाेती. त्यानंतर परदेशी यांच्या सूचनेनूसार क्रेडाईने कुठे किती दरवाढ करावी, या अाशयाचे निवेदन त्यांना सादर केले अाहे. या निवेदनात क्रेडाईने मुद्रांक अायुक्तांना शहरालगतच्या परिसरात वास्तववादी दरवाढ कशा स्वरूपाची असावी याचे दरही सुचविले आहेत.