आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Construction Work News In Marathi , Land Acquisition

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहीमार्ग भूसंपादनासह इतर कामे 14 ऑगस्टपर्यंत करा, विभागीय आयुक्तांचे आढावा बैठकीत आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाहीमार्गावरील अडचणींचा निपटारा 14 ऑगस्टपर्यंत करण्याचे स्पष्ट आदेश सोमवारी विभागीय आयुक्तांनी दिले. शाहीमार्ग भूसंपादनाला गती देण्यासाठी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी महापालिका, जिल्हा भूसंपादन कार्यालय तसेच मिळकत विभागाला या आढावा बैठकीत कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून दिली.
शाहीमार्गावरील तपोवनातील 12 मीटर डीपीरोड, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ते पंचवटी डेपो हा 12 मीटर डीपीरोड, काट्या मारुती मंदिर ते काळाराम मंदिर हा 9 मीटर डीपीरोड, परतीच्या शाहीमार्गावरील रामकुंड ते मालवीय चौक तसेच
पाथरवट लेन हा 12 मीटर डीपी मार्ग, सरदार चौक ते रामकुंड, कपालेश्वर मंदिर, मालेगाव स्टॅण्ड मार्गांच्या भूसंपादनास अग्रक्रम द्यावा. नियोजन, शहर विकास व महापालिका अधिकार्‍यांनी संयुक्त बैठक घेऊन याबाबत कार्यवाही करण्याबरोबरच वाहनतळ, गंगापूर, पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्राचे काम पूर्ण करण्याच्याही सूचनाही आयुक्त डवले यांनी दिल्या.
पुनर्वसन उपायुक्त टी. एम. बागुल, जिल्हाधिकारी विलास पाटील, भूसंपादन, मिळकत अधिकारी तसेच नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.