आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेल्जियमकडून नाशिकच्या उद्याेगांची चाचपणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बेल्जियमच्या काॅन्स्युलेट जनरलचे व्यापार गुंतवणूक अायुक्त व्युरगन मरशान यांनी शुक्रवारी (दि. ९) नाशिकच्या अाैद्याेगिक क्षेत्राला भेट दिली. स्थानिक उद्याेजकांशी चर्चा करीत नाशिकमधील कंपन्या अाणि त्यांची उत्पादने यांची माहिती घेऊन बेल्जियम नाशिकमध्ये अायात-निर्यातीच्या अनेक संधी उपलब्ध असून, नाशिकच्या उद्याेजकांनी त्याचा फायदा घ्यावा असे अावाहन त्यांनी केले.
नाशिक इंडस्ट्रीज अंॅड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या (निमा) कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, मानद सरचिटणीस उदय खराेटे, सचिव ज्ञानेश्वर गाेपाळे, नितीन वागस्कर यांनी मरशान यांच्याशी संवाद साधला. नाशिकची अाैद्याेगिक वसाहत, कंपन्या, उत्पादने यांची सविस्तर माहिती देणाऱ्या चित्रफितीचे यावेळी निमाच्या पदाधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.

अायटी, वस्त्रप्रावरणे, रसायने, अन्न उत्पादने, फ्राेजन फूड, अाैषधे यांसारख्या क्षेत्रात माेठ्या प्रमाणावर बेल्जियम अायात करताे तर तंत्रज्ञान, हिरे, अन्न पदार्थ पेय, बेकरी पदार्थ, चाॅपस्टिक्स यांची निर्यात केली जाते, असे मरशान यांनी सांगितले. मुंबईइतक्या क्षेत्रफळावर वसलेला हा देश असून ११ लाख लाेकसंख्या अाहे. मात्र, चार बंदरे येथे असल्याने दळणवळण माेठ्या प्रमाणावर हाेते, त्यातही अंॅटवर्थ हे प्रसिद्ध बंदर असून अाैद्याेगिक उत्पादनांच्या अायात-निर्यातीमुळे सर्वाधिक वर्दळ येथे असते, असे सांगताना तेथील भाैगाेलिक अाैद्याेगिक स्थितीची माहिती मरशान यांनी दिली.

नाशिकच्या उद्याेगांना संधी
नाशिक येथील उद्याेजकांना बेल्जियमशी व्यवसायवृद्धीची माेठी संधी उपलब्ध असल्याचे मरशान यांनी स्पष्ट केले. अाैद्याेगिक विकासासाठी अावश्यक असलेली पुरेपूर मदत बेल्जियम सरकार उपलब्ध करून देते. त्यामुळे बेल्जियममध्ये गुंतवणुकीचीही संधी नाशिकच्या उद्याेगांना उपलब्ध असल्याकडे मरशाॅन यांनी लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...