आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर सराफी पेढ्या झळाळल्या, साेने 30 हजार तर चांदी 41 हजारांच्या अासपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चांदीखरेदीचे विशेष महत्त्व असलेल्या धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर शहरवासीयांनी मंगळवारी चांदी, चांदीच्या वस्तू, चाेख साेने, दागिने खरेदी केल्याने शहरातील सराफी पेढ्या झळाळल्याचे चि त्र पहायला मिळाले. चांदीबराेबरच चाेख साेने, दागिन्यांना माेठी पसंती मिळाली, शहरात साेन्याचे भाव प्रती ताेळ्याकरिता ३० हजार रुपयांच्या अासपास तर चांदीचे भाव ४१ हजार रुपयांच्या (प्रती किलाे) अासपास राहिले. 
 
व्यावसायिकांच्या मते दिवसभर ग्राहकांचा प्रतिसाद हाेता. ज्यात सायंकाळनंतर वाढ झाली. काही दालने तर ग्राहकांनी खच्चून भरलेली हाेती. 
 
यंदा बाजारात सकारात्मक स्थिती 
धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावरदिवसभर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद हाेता. मागील वर्षाप्रमाणेच यावर्षीही व्यवसाय हाेईल, अशी बाजारात सकारात्मक स्थिती अाहे. साेन्याचे दागिने, माेठे दागिने अाणि चांदीला चांगली मागणी राहीली. -अनिल दंडे, संचालक, गाेविंद दंडे अॅण्ड सन्स 
 
हवातसा दागिना बनवून घ्यायला ग्राहकांकडून मिळाली पसंती 
अाज३०हजारांच्या अासपास साेन्याचा दर राहिला. मुहूर्तावरील खरेदीसाठी चांगली गर्दी दिवसभर हाेती. यंदा अापल्याला हवा तसा दागिना बनवून घेण्यास ग्राहकांची पसंती मिळाली. मंदी वगैरे काही जाणवत नसल्याचा अनुभव अाला. 
- हर्षल नाईक, संचालक, मिरजकर सराफ अॅण्ड जेम्स प्रा.लि. 
बातम्या आणखी आहेत...