आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील बहुतांश भागात दूषित पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील बहुतांश भागात काही दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा सुरूच असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आठवडाभरापासून भीमवाडी परिसरात चक्क अळ्यामिश्रित पाणीपुरवठा होत असून, तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

इंदिरानगर, विनयनगर, जयदीपनगर, जुने नाशिक, सातपूर, सिडको, पंचवटी भागात १५ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे, तर जुन्या नाशकातील भीमवाडी, घासबाजार परिसरात चक्क दोन दिवसांपासून अळ्यामिश्रित पाणीपुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या भागातील ड्रेनेजमधून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन गेल्याने हा प्रकार सुरू आहे. पाण्यामुळे स्थानिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. विभागीय कार्यालयांत तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून डोळेझाक केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दूषित पाणीपुरवठ्याबाबत त्वरित निर्णय घेतल्यास आंदोलनाचा इशारा भीमवाडी परिसरातील नागरिकांनी दिला आहे.