आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्गजांच्या सुरावटींवर उजळणार सांजदीप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिग्गजांच्या तपश्चर्येतून उमटलेल्या स्वरांची अनुभूती घेण्याची पर्वणी नाशिककर रसिकांना घेता येणार आहे. देशाच्या संगीत क्षेत्रात आदरस्थानी असलेल्या पंडितांच्या मैफली दोन दिवस शहरात रंगणार आहेत.
व्हायोलिन म्युझिक अकॅडमी आणि नाशिक लिसनर्स ग्रुपतर्फे ‘स्वरझंकार’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘दिव्य मराठी’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत. शनिवार (दि. १५) आणि रविवार (दि. १६) अशी दोन दिवस ही मैफल सायंकाळी वाजता मुंबईनाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार आहे. शनिवारी पंडित उपेंद्र भट आणि पंडित शिवकुमार शर्मा हे स्वरवंदना करतील. शहरातील रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारदस्त गायकी, ख्याल गायन, ठुमरी तसेच पंडित भीमसेन जाेशी यांनी अजरामर केलेली भजने अभंग यांच्यावर उपेंद्रजींनी प्रभुत्व मिळविले आहे. पंडितजींची जागा परंपरा चालविणारे ते एक ज्येष्ठ शिष्य आहेत. सध्या ते एमआयटीच्या विश्वशांती संगीत महाविद्यालयात ज्येष्ठ गुरू म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे गायन पंडित भीमसेन जाेशी यांच्या स्मृतींना उजाळा देणारे असेच असते.
संतूरला लोकमान्यता मिळवून देणारे पंडित शिवकुमार शर्मा यांनी सुरुवातीला निष्णांत तबलावादक म्हणून नाव कमावले. त्यांचे लयकारीवर प्रभुत्व आहे. सहजसुंदर आलापी, रागातील सुरांचा ताल लयीशी होणाऱ्या संवादाशी खेळत त्यांच्याकडून उमटणारा ध्वनी हा क्षण म्हणजे रसिकांना मोहित करतो. पंडित हरिप्रसाद चाैरसिया यांच्याबरोबर त्यांनी शिव-हरी या नावाने संगीत दिग्दर्शनही केले आहे.