नाशिक - दुरुस्तीसाठीनेला जाणारा नादुरुस्त कंटेनर भुजबळ फार्मसमोर उलटल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या कंटेनरला दुसऱ्या कंटेनरद्वारे नेले जात असल्याने, रस्त्यावर रहदारी नसल्याने सुदैवाने प्राणहानी टळली. या घटनेत महामार्गाच्या दुभाजकावरील जाळ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले. नादुरुस्त कंटेनरला घेऊन जात असलेल्या कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटल्याने, पाठीमागील कंटेनर (एमपी ०९, एचजी-०६९६) उड्डाणपुलावरून उतरताच वेगात खाली कोसळला. याप्रकरणी अंबड पोलिसांत नोंद करण्यात आली असून, रस्त्यावरील अन्य तीन कंटेनर चालकांचीही चौकशी केली जात आहे.