आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Contractor Neglected Garden Care ; Corporation Not Pay Tension

उद्यानांच्या देखभालीकडे ठेकेदार करताहेत दुर्लक्ष ; महापालिकेचाही काणाडोळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - खासगीकरणातून उद्याने विकसित करण्याचा महापालिकेचा दावा फोल ठरला असून देखभाल-दुरुस्तीपोटी होणार्‍या खर्चाचा विचार करता मिळणारे उत्पन्न तुटपुंजे आहे. उत्पन्नाचे ठोस पर्याय पालिकेला सापडल्यास त्यातून उद्यानाची नियमित काळजी घेणे शक्य होणार आहे.

महापालिकेच्या सुमारे चारशेपैकी बोटावर मोजण्याइतकीच उद्याने नाशिककरांना विरंगुळा देण्यात सक्षम ठरत आहेत. नगरसेवकांनी अगदी प्रभागनिहाय उद्याने थाटली असली तरी त्यांची अवस्था दयनीय आहे. सध्या जवळपास 80 टक्के उद्याने खासगी ठेकेदारांकडे देखभालीसाठी दिलेली आहेत. ठेकेदारांना देखभालीसाठी दिल्या जाणार्‍या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मात्र कमी आहे. निव्वळ देखभालीचाच यात विचार करण्यात आला असून संबंधित उद्यानातून नागरिकांना परवडतील अशा सुविधा उपलब्ध करून देत त्यातून सहज उत्पन्न मिळवण्याच्या पर्यायांकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आहे.
स्थानिकांना रोजगार अन् पालिकेला उत्पन्न

एकरभर उद्यानाची देखभाल करण्यासाठी सुमारे दहा हजार रुपयांचा खर्च येतो, असे उद्यान विभागातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. आजघडीला अनेक उद्यानांबाहेर खाद्यपेय विक्रेत्यांनी अनधिकृत स्टॉल थाटले आहेत. काही काळाने याच गाड्यांना कोणतेही शुल्क न आकारता अधिकृत स्थान द्यावे लागत असल्याचे नेहरू गार्डन परिसरातील उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्येक उद्यानात गरजेप्रमाणे स्थानिकांना खाद्यपेय विक्री करण्याचे स्टॉल लिलाव पद्धतीने दिले किंवा फुगे-वाद्ये अशा मुलांना आकषरून घेणार्‍या वस्तूच्या विक्रींसाठी भाडेतत्त्वावर किंवा विशिष्ट अटी-शर्तींवर परवाने दिले तर पालिकेला चांगले उत्पन्न मिळू शकेल. यातून पालिकेला स्वत:च्याच उत्पन्नातून उद्यानांचा विकास करणे सहज शक्य होईल. अभय कुलकर्णी, नाशिक फस्र्ट


उद्यान उत्पन्नाचा ताळेबंद
वर्ष असा खर्च असे उत्पन्न
2008-09 एक कोटी 17 लाख 86 हजार
2009-10 88 लाख 1 कोटी 51 लाख
2010-11 एक कोटी 6 लाख 27 लाख 28 हजार
2011-12 एक कोटी 75 लाख 8 लाख
2012-13 एक कोटी 70 लाख 15 लाख