नाशिक- अाधीचवादग्रस्त एलईडी खरेदीने प्रकाशात अालेल्या महापालिकेच्या विद्युत विभागात अाता गैरकारभाराचा लखलखाट झाला असून, ठेकेदारांसाठी नियम गुंडाळून दंड वाचविण्यासाठी चक्क मागील तारखेचे बिल मंजूर करण्याचा प्रताप करणाऱ्या तीन अभियंत्यांना प्रशासनाने निलंबित करून त्यांच्या खातेनिहाय चाैकशीचे अादेश दिले अाहेत. विशेष म्हणजे, यात प्रभारी अधीक्षक अभियंता तथा मूळ उपअभियंता असलेले वसंत लाडेंचाही समावेश अाहे. एलईडीच्या मुद्यावरून संशयास्पद उत्तरे दिल्याने त्यांना अनेक वेळा नगरसेवकांच्या राेषाचा सामना करावा लागत हाेता.
पालिकेच्या विद्युत विभागात सक्षम अर्हता असलेला अधिकारी नसल्याने चक्क प्रभारींकडे संबंधित विभागाची सूत्रे अाहेत. परिणामी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर काेणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र असून, वादग्रस्त २०२ काेटींच्या एलईडी प्रकरणात वारंवार स्थायी समितीची नगरसेवकांची दिशाभूल केल्याने हा विभाग वादग्रस्त ठरला हाेता. मध्यंतरी बाहेरील ठेकेदारांना काम देण्यावरून स्थानिक ठेकेदारांचा अधिकाऱ्यांसमाेरच संघर्ष झाल्याची घटना घडली हाेती. ठेकेदारांना दंडापासून वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी चक्क माेजमाप पुस्तिकेत नाेंदी करून पालिकेचा महसूल बुडविल्याचे यातून समाेर अाले अाहे.
एलईडीप्रकरणाबाबत माैन का? : सत्ताधारीमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वादग्रस्त २०२ काेटींच्या एलईडी प्रकरणाचा साेक्षमाेक्ष लावण्याची विनंती अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्याकडे केली हाेती. मध्यंतरी कायदेशीर कारवाई करून निकाल लावण्यासाठी वकिलांचा सल्ला घेण्याचा निर्णय झाला हाेता. त्या अनुषंगाने काय पावले उचलली याबाबत भूमिका स्पष्ट झालेली नाही.
असा झाला गडबड घाेटाळा
जेलराेडयेथील जुने पथदीप काढून इतरत्र वापरण्याचे सुमारे लाखांचे काम २८ मे २०१४ राेजी पूर्ण करणे अावश्यक हाेते. या कामाच्या १० एप्रिल २०१४ २८ मे २०१४ राेजीच्या नाेंदी अाहेत. ज्या माेजमाप पुस्तिकेत या नाेंदी केल्या जातात ती पुस्तिकाच छपाई विभागाने मे २०१४ राेजी विद्युत विभागाला िदली हाेती. मे मध्ये जारी पुस्तिकेत २८ फेब्रुवारी २०१४ राेजीच्या म्हणजे तीन महिने अाधीच्या नाेंदी अाहेत. वेळेत काम पूर्ण केल्याचे दाखवून ठेकेदाराला दंडात्मक कारवाईपासून वाचविण्यासाठी संगनमताने नियमबाह्य नाेंदी केल्याचा ठपका प्रशासनाने यात ठेवला अाहे. नाशिकराेडच्या प्रभाग क्रमांक ३४ ‘ब’ मधील कामाची ठेकेदारांची देयके मंजूर करण्यासाठी अतिरिक्त अायुक्तांची दिशाभूल केल्याचेही समाेर अाले अाहे.
सीसीटीव्ही निविदा प्रक्रियेत गाेंधळ
जेडीसीबिटकाे रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्याच्या ई-निविदा प्रक्रियेत विद्युत विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अनेक गाेंधळ घातल्याचे समाेर अाले अाहे. यात निविदाधारकांची तांत्रिक कागदपत्रे तपासून मिळालेल्या अहवालाची अावक वहीत नाेंद घेता अापल्याकडे ठेवणे, दुसऱ्यांदा पुन्हा हितसंबंधी व्यक्तीकडून अहवाल मागवून घेणे, संबंधित अहवाल दुसऱ्याच निविदाधारकांना उपलब्ध करून देणे अादी बाबी विशिष्ट मक्तेदारास फायदा मिळवून देण्याच्या दृष्टीने संशयास्पद ठरल्याचे प्रशासनाने म्हटले अाहे.
विद्युत विभागाचे निलंबित अभियंता असे...
उपअभियंतावसंत गाेपाळदास लाडे
कनिष्ठ अभियंता कृष्णा बाबूराव जगदाळे
सहायक कनिष्ठ अभियंता माेहन विजयराव गिते