आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल याेजनेला ठेकेदारांचे ‘ताळे’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत राबविण्यात येणार्‍या घरकुल याेजनेला ठेकेदारांकडूनच हरताळ फासला जात असून, शिवाजीवाडी आणि वडाळा येथील याेजनेच्या ठेकेदाराने काम परवडत नसल्याचे कारण देत अर्धवट अवस्थेत काम साेडले आहे. विशेष म्हणजे संबंधित काम तब्बल १५० टक्क्यांपेक्षाही अधिक दराने अन्य ठेकेदारांना देण्यात आल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे. फेब्रुवारी महिन्यातील स्थायी समितीच्या सभेत काेणतीही वाच्यता करता या कामाला मागच्या दाराने मंजुरी देण्यात आली.

झाेपडपट्टी मुक्त शहर हाेण्याच्या दृष्टीने नेहरू अभियानांतर्गत नाशिकमध्ये घरकुल याेजना राबविण्यात येत आहे. यात केंद्र शासनाचा वाटा ३० टक्के, राज्य शासनाचा २० टक्के, तर महापालिकेचा ३० टक्के वाटा आहे. प्रारंभी ही याेजना १६ हजार घरकुलांसाठी राबविण्यात येणार हाेती. परंतु, त्यास प्रतिसाद मिळाल्याने ती साडेसात हजार घरकुलांपुरतीच राबविण्याचा निर्णय प्रशासनाने परस्पर घेतला. या याेजनेतील आणखी एक गाेंधळ प्रकाशझाेतात आला आहे. शिवाजीवाडी आणि वडाळा गावातील घरकुल याेजनेतील घरांची कामे जवळपास ९५ टक्के पूर्णत्वास आली आहेत. परंतु, पालिकेचे दर परवडत नसल्याचे कारण दाखवत दाेन्ही याेजनेतील ठेकेदारांनी ही याेजना अर्धवट अवस्थेत साेडली आहे. यात शिवाजीवाडी येथे ६२० घरकुलांची याेजना आहे. तर, वडाळागाव येथे याेजनेचे दाेन प्रकल्प साकारले जात आहेत. ठेकेदाराने काम साेडल्याने प्रशासनाने परस्पर निविदा काढून संबंधित काम अनुक्रमे १६५, १६४ आणि १४६ टक्के जादा दराने मंजूर करण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या स्थायी समितीच्या एका सभेत सदर काम विनाचर्चा मंजूर करण्यात आले.

घरकुल याेजनेसाठी झाले होते सर्वेक्षण
झाेपडपट्टी निर्मूलनासाठी केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान याेजनेंतर्गत नाशिक शहरात घरकुल याेजना राबविण्याचे निश्चित करण्यात आले हाेते. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन महापालिका निधी उपलब्ध करून देणार आहे. घरकुल याेजना शहरात कुठे कुठे राबवायची, याबाबतचा सर्व्हे करण्यात आला हाेता. यासाठी सर्व्हेवर सुमारे चार काेटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र, मिळकत विभागाने याेजनेची जागाच ताब्यात घेतल्यामुळे अनेक ठिकाणची याेजना रद्द करावी लागली आहे.

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान याेजनेतील महत्त्वाच्या अशा घरकुल याेजनेचे काम अर्धवट अवस्थेत साेडणार्‍या ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीतदेखील टाकण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...