आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४ कोटींचा खड्डे दुरुस्ती प्रस्ताव संशयाच्या भोवऱ्यात, शिवसेना विचारणार जाब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
नाशिक - कुंभमेळ्यानिमित्त शहरात ४५० कोटी रुपयांचे रस्ते नुकतेच झाले असताना महापालिकेच्या बांधकाम विभागाने जवळपास २४ कोटी रुपयांचा प्रस्ताव खड्डे दुरुस्तीसाठी ठेवल्यामुळे वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी आक्षेप घेत गेल्या तीन वर्षांत खड्डे दुरुस्तीवर झालेला खर्च, रस्ते देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ज्या ठेकेदारांची आहे त्यांनी काय केले, असे सवालही केले आहेत.
नाशिक महापालिकेला खड्ड्यांवर ठोस उपाय अद्यापही सापडलेला नाही. परिणामी, कितीही चांगला रस्ता केला की, काही दिवसांतच त्यावर खड्ड्यांचे थिगळ दिसण्याचे प्रकार घडत आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे शहरातील अनेक कॉलनी अंतर्गत रस्ते, तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले अाहेत. खड्ड्यांविरोधात तक्रारी वाढू लागल्यावर बांधकाम विभागाने दुरुस्तीचे अस्त्र बाहेर काढले असून, शहरातील सहाही विभागांत जवळपास २४ कोटी रुपयांची रस्ते दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला असून, संबंधित प्रस्तावाबाबत शिवसेनेने संशय व्यक्त केला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात अंतर्गत बाह्य रिंगरोडबरोबरच काही रस्त्यांची कामे झाली आहेत. जवळपास ४५० काेटी रुपयांची रस्त्यांची कामे झाल्याचा दावाही मध्यंतरी सत्ताधारी मनसेने केला होता. चांगले रस्ते होत असतील, तर त्यास विरोध नसून रस्त्याचे काम झाल्यानंतर काही दिवसांतच खड्डे पडत असतील, तर त्याचा जाब नक्कीच विचारला जाईल, असे बोरस्ते यांनी स्पष्ट केले.
दर्जाविषयीच संशय
काोट्यवधींचे रस्ते अचानक उखडतात कसे? महापालिका चांगले तंत्रज्ञान दर्जाबाबत काळजी का घेत नाही? २४ कोटींच्या खर्चाला विरोध नसून, यापूर्वी झालेल्या खर्चाचे काय झाले, तसेच ठेकेदार दुरुस्ती का करीत नाहीत, याचा हिशेब घेतला जाणार आहे.
अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना
स्पष्टीकरण मागवणार
शिवसेनेकडूनस्थायी समितीच्या सभेत, तसेच महासभेत खड्डे दुरुस्तीसाठी २४ कोटींचा निधी कसा ठेवला, हे विचारले जाईल. या निधीतून कोणते किती खड्डे दुरुस्त केले जाणार, कोणत्या रस्त्यांवर दुरुस्ती होणार, या रस्त्यांची निर्मिती कधी झाली, ठेकेदारामार्फत देखभाल कालावधी कोणता, त्यात खड्डे भरले की नाही, जर नसेल, तर महापालिकेने काय कारवाई केली, याचे स्पष्टीकरण महापालिकेकडून मागविले जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...