आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असमान निधी; भाजपमधील धुसफूस अाली चव्हाट्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘सबकासाथ, सबका विकास’ अशा न्यायाने काम करण्याचा देखावा भाजपकडून उभा केला जात असला, तरीही प्रत्यक्षात महापालिकेसह विधानसभा मतदारसंघातील निधीच्या असमान वाटपावरून पक्षांतर्गत धुसफूस सुरू अाहे. प्रभाग क्रमांक मधील विकासकामांचे भूमिपूजन लाेकार्पण साेहळ्याप्रसंगी काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत जाहीरपणे वाच्यता करीत समान निधी वाटपाकडे श्रेष्ठींचे लक्ष वेधले. 


पालिकेत भाजपची सत्ता अाल्यानंतर अंतर्गत कलह राेखण्याचे अाव्हान शहराध्यक्षांना पेलावे लागत अाहे. पालिकेतील काही वजनदार नगरसेवकांच्या प्रभागांसाठी अधिक कामे मंजूर हाेतात, नवख्यांकडे लक्षही दिले जात नाही, अशी तक्रार धिम्या अावाजात केली जात अाहे. या तक्रारीला जाहीर स्वरूप प्रभाग मधील कार्यक्रमात अाले. सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या या प्रभागात ३२ विकासकामे मंजूर करण्यात अाली. यात ५२ ग्रीन जिम उभारण्याच्या कामांना एकाच कामात समाविष्ट केले गेले. या कामांपैकी काहींचे भूमिपूजन तर काही कामांचे लाेकार्पण पालकमंत्री महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. सभागृहनेत्यांच्याच प्रभागात इतकी कामे कशी मंजूर झालीत? असा अाश्चर्य व्यक्त करणारा सवाल स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी अापल्या भाषणात केला. भाजपचे गटनेते संभाजी माेरुस्कर यांनीही प्रारंभी ‘समान विकासा’च्या तत्त्वाला अधाेरेखित करीत सर्वच प्रभागांमध्ये एकसारखी कामे मंजूर व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रत्येक प्रभागात इतकी कामे मंजूर व्हावीत, असा अाग्रहही त्यांनी महापाैरांसमाेर धरला. दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांनीही या प्रभागात इतक्या माेठ्या संख्येने कामे मंजूर हाेत असल्याबद्दल अाश्चर्य व्यक्त केले. 


कामे मंजूर करण्यासाठी पाटील काेणत्या शैलीचा वापर करतात याची माहिती महापाैरांनी अापल्याला दिली अाहे, मात्र याबाबत जाहीर वाच्यता करण्याची सूचनाही त्यांनी अापल्याला दिल्याचा टाेला यावेळी पालकमंत्र्यांनी लगावला. एकीकडे पालिकेशी संबंधित कामांबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे दिनकर पाटील यांनी थेट पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या मंजूर निधीकडे अंगुलीनिर्देश करीत सानप यांच्या प्रभागात ४०० काेटींचा निधी कसा मंजूर झाला? असा थेट सवाल केला. गेल्या सिंहस्थात पंचवटीसाठी स्वतंत्र ६०० काेटी मंजूर हाेते, असा खुलासा करतानाच अाठ महिन्यांत जितकी कामे प्रभाग मध्ये मंजूर झाली तितकी इतरत्र झाली नसल्याची माहिती देण्यास सानप विसरले नाही. सभागृहनेत्यांप्रमाणेच अन्य नगरसेवकांच्या प्रभागांतही तितकीच कामे मंजूर व्हावीत, असाच सूर भाजपच्या व्यासपीठावरून यावेळी अाळवला गेला. 

बातम्या आणखी आहेत...