आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलरोडला अतिक्रमण पथकावर दगडफेक, पथकाचे वाहनांसह पलायन; पोलिसांची बघ्याची भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा जेलरोडला बुधवारी (दि. २८) फज्जा उडाला. संतप्त जमावाने वाहनांवर दगडफेक करून अतिक्रमण कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याने कर्मचाऱ्यांनी वाहनांसह पळ काढला. नाशिकरोड देवळाली व्यापारी-हॉकर्स-टपरीधारक असोसिएशनने रस्त्यावर ठिय्या दिल्याने पथकाला मोहीम गुंडाळावी लागली.

जेलरोडवरील पश्चिम बाजूकडील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेस इंगळेनगर चाैकातील नावंदर सदनपासून सुरुवात करताना रविकिरण किराणा, हॉटेल मंजुळा, गौरी किराणा, ललित मेडिकलचे नामफलक हटवण्यात आले. बाजूच्या लक्ष्मी फ्लोअर मिलचे अतिक्रमण पाडण्यात आले. मात्र, रस्त्यातील कांकरिया मेडिकलला हातही लावल्याने व्यापारी संतापले. मेडिकलवर कारवाई केल्याशिवाय इतर अतिक्रमणाला हात लावू नका, अशी भूमिका भय्या बाहेती, मिलिंद रसाळ आदींनी घेतली. संबंधित मेडिकल दुकानावर कारवाई करण्याचे कारण अधिकाऱ्यांना देता आले नाही.

अतिक्रमण पथक पुढे जात असताना असोसिएशनचे शशिकांत उन्हवणे, शिवाजी भोर, राजू मोरे, वाल्मीक बागुल मा ेठ्या जमावासह तेथे आले. गर्दीचा फायदा उठवत अज्ञात व्यक्तींनी पालिकेच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यातच जमाव जेसीबीच्या मागे धावल्याने अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी वाहनांसह पळ काढला. तासाभराने जेसीबी व्यापारी बँकेसमोर येताच जमावाने विरोध केला. वरिष्ठ निरीक्षक नारायणराव न्याहाळदे यांच्या मध्यस्थीनंतर अतिक्रमण अधिकारी जगताप, वाडेकर यांनी माघार घेत मोहीम थांबवल्याचे जाहीर केले. जमावाचा तीव्र विरोध, बघ्यांच्या गर्दीमुळे जेलरोडवरील वाहतूक ठप्प झालेली असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती.

वाहतूक ठप्प
व्यावसायिकांनीजेलरोडवर ठिय्या दिला. त्यातच बघ्यांच्या गर्दीमुळे जेलरोडकडून दसककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक दाेन तास ठप्प झाली. भीमनगर शिवाजीनगरच्या पुढे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी, प्रेस कामगारांची धावपळ झाली. सहाजणांविरुद्ध गुन्हा

अधिकाऱ्यांचे लागेबांधे
-‘कांकरियामेडिकल’च्या अतिक्रमणामुळे झालेल्या अपघातात चार निरपराधांनी जीव गमावला आहे. तरीही अतिक्रमण हटवले नाही. अधिकारी अतिक्रमणधारकांचे लागेबांधे आहेत. -मिलिंद रसाळ, व्यावसायिक