आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचलित पद्धतींचा अवलंब केल्यास जलसंवर्धन शक्य; डॉ. एन. जे. पवार यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्त विद्यापीठात आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत बोलताना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार. समवेत डावीकडून कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, डॉ. एन. जे. पवार, डॉ. नितीन करमाळकर, डॉ. ई. वायुनंदन, प्रा. सतीश ठिगळे, डॉ. राजेंद्र वडनेरे, डॉ. जयदीप निकम. - Divya Marathi
मुक्त विद्यापीठात आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत बोलताना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार. समवेत डावीकडून कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, डॉ. एन. जे. पवार, डॉ. नितीन करमाळकर, डॉ. ई. वायुनंदन, प्रा. सतीश ठिगळे, डॉ. राजेंद्र वडनेरे, डॉ. जयदीप निकम.
 नाशिक: दुष्काळाच्या समस्येतून कायमची मुक्तता करायची असेल तर जलसंवर्धनाची नितांत गरज आहे. पाण्याचा वापर वारेमाप टाळून अचूक नियोजन करायला हवे. सध्याची भौगोलिक परिस्थिती पाहता अनेक राज्यांत जलसिंचनासाठी ज्या जुन्या प्रचलित पद्धतीचा वापर होतो आहे, तीच पद्धत महाराष्ट्रातही हवी, असे मत कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी व्यक्त केले. पाण्याची बचत करणारे नावीन्यपूर्ण प्रयोग केल्यास जलसंवर्धन शक्य होईल त्यातूनच दुष्काळाच्या समस्येवर मात करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केली. 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विद्याशाखेतर्फे ‘पाणी समस्या व्यवस्थापन भविष्यातील आव्हाने’ विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते झाले.
 
त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इ. वायुनंदन, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, पुणे विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख प्रा. सतीश ठिगळे, डॉ. राजेंद्र वडनेरे, डॉ. जयदीप निकम होते. डॉ. पवार पुढे म्हणाले, पाणी व्यवस्थापनाचे विशिष्ट पद्धतीने नियोजन केल्यास भविष्यात पाण्यावरून युद्ध पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
या पार्श्वभूमीवर मुक्त विद्यापीठाने आयोजित केलेल्या पाणी परिषदेसारख्या कार्यशाळांची आवश्यकता आहे. जलसंवर्धनाबाबत ते म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय समाजाची मानसिकतादेखील महत्त्वपूर्ण आहे. केवळ शासकीय योजनांवर अवलंबून राहता पाण्याच्या संवर्धन त्याच्या अचूक व्यवस्थापन करण्यासाठी समाजानेच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. 

कुलगुरू डॉ. वायुनंदन यांच्यासह डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. उदय पाटणकर, डॉ. खान डॉ. बरिडे, मनोहर पाटील यांनीही मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत राज्यातील विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, प्राचार्य, पाणी क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवक आणि संस्थांच्या अडीचशेहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा. राम ठाकर, संगीता देशपांडे बाळू साबळे आदी प्रयत्नशील होते. प्रास्ताविक डॉ. जयदीप निकम यांनी केले. श्वेता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्राजक्ता देशमुख यांनी आभार मानले. 
 
ग्रामस्तरावर जलमित्र बनवणे काळाची गरज प्रा. सतीश थिगळे 
पाण्याचीटंचाई दूर करण्यासाठी केवळ सरकारचे प्रयत्न पुरेसे नाहीत, तर ग्रामस्तरावर जलमित्र तयार करणे काळाची गरज आहे, असे पुणे विद्यापीठाचे माजी भूशास्त्र विभागप्रमुख प्रा. सतीश थिगळे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत राज्याला दुष्काळाने वेढलेले होते. अद्यापही शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्या करत आहेत. अशा परिस्थितीत पाणी वाचवणे हे फक्त सरकारचेच नव्हे तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हाच संदेश प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण ‘जलमित्र होऊ दुष्काळावर मात करू’ ही चळवळ उभी केली आहे. याअंतर्गत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जलसाक्षर केले जाते. या संपूर्ण उपक्रमाची माहिती त्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. गावपातळीवर जलमित्र तयार करून दुष्काळावर सहज मात करता येईल असे सांगितले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...