आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Convocation Of PSI In Police Training Academy Today

उपनिरीक्षकांची परेड सावधान! आज गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी आणि पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक दीड हजार उपनिरीक्षक सेवेत दाखल होणार असून, त्यांचा दीक्षांत समारंभ शुक्रवारी गृहमंत्री आर. आर. पाटील व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

ब्रिटिश सरकारने पोलिस अधिकार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीस 106 वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रबोधिनीतून राज्याच्या पोलिस दलात उपनिरीक्षक व उपअधीक्षक दाखल होत असतात. राज्यात पोलिस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षकांची चार ते पाच हजार पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी व भ्रष्टाचारामुळे काही वर्षे उपनिरीक्षकांची भरती स्थगित झाली होती. त्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नियमित भरती प्रक्रिया सुरू आहे.

यामध्ये गेल्या 1 ऑक्टोबर 2012 पासून सर्वात मोठय़ा तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. त्यात 1 हजार 229 प्रशिक्षणार्थी प्रबोधिनीत आणि तुरची (ता. तासगाव (सांगली) येथे 310 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले. एक हजार 539 उमदेवारांचा दीक्षांत समारंभ प्रबोधिनीच्या नव्या मैदानावर सकाळी 8 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास पोलिस महासंचालक संजीव दयाळ उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय धर्तीवरील अभ्यासक्रम

उपनिरीक्षकांना गेल्या 20 वर्षांपासूनच्या पारंपरिक अभ्यासक्रमाद्वारेच प्रशिक्षण दिले जात होते. मात्र, यंदाच्या तुकडीस राष्ट्रीय पोलिस अकॅडमी, हैदराबादच्या धर्तीवर नव्याने तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रात्यक्षिक व लेखी प्रशिक्षण देण्यात आले.

कालबाह्य कायदे दूर करत या अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा सामना, सायबर क्राइम, आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापनशास्त्र या विषयांवर भर देण्यात आला आहे. तसेच, स्त्रिया, मुलांशी पोलिस स्थानकात संवाद, पांढरपेशी गुन्हेगारांचा बीमोड अशा नवीन कायद्यांचाही त्यात समावेश आहे.

प्रशिक्षणार्थींची मोहिम फत्ते
जुन्या नाशिकच्या बागवानपुरा भागातील हाजी चिकन दुकानात दुर्मिळ असलेल्या दोन उदमांजरांसह (तिवेट) तितर पक्ष्यांना पिंजराबंद करण्यात आले होते. ही माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने वनपरिक्षेत्र अधिकारी राजन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी छापा टाकला. त्यात पथकाने उदमांजर व तितर ताब्यात घेतानाच दुकान मालक आदीम सलीम शेख यालाही अटक केली. धाडीच्या निमित्ताने वनविभागाच्या डोळ्यात धूळफेक करत दुर्मिळ प्राणी व पक्ष्यांचा व्यवसाय जोरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

अशी झाली मोहिम फत्ते... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...