आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांततेसाठी समन्वय समिती स्थापन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तळेगाव घटनेनंतर शहरात बिघडलेली कायदा- सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम आहे. मात्र, दोन समाजामध्ये निर्माण झालेला तेढ दूर करण्यासाठी नेत्यांनी समाजाला आवाहन करावे. दोन्ही समाजात भाईचारा कायम राखण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. दरम्यान, शहर जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात अाली.
सोमवारी (दि. १०) सकाळी पोलिस आयुक्तालयात दोन्ही समाजाच्या नेत्यांसह लोकप्रतिनिधी आणि शांतता समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर दोन्ही समाजाच्या नेत्यांनी जिल्हा रुग्णालयात पीडित मुलीची भेट घेतली. समन्वय समिती स्थापन केली. ही समिती शहर जिल्ह्यात शांतता राखण्याचे आवाहन करणार आहे. तळेगाव घटनेनंतरच्या अांदाेलनाला शहरात हिंसक वळण लागल्याने तणावपूर्ण वातावरण होते. परिस्थितीवर पोलिसांनी वेळीच नियंत्रण ठेवल्याने शहरात किरकोळ दगडफेकीच्या घटना वगळता शांतता होती. पाेलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी अायाेजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीस महापौर अशोक मुर्तडक, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे,माजी महापौर प्रकाश मते, माजी महापौर अशोक दिवे, नीलिमाताई पवार, अजय बोरस्ते, नगरसेवक संजय साबळे, कविता कर्डक, किशोर घाटे, प्रकाश पगारे, बाळासाहेब कर्डक, नाना महाले, रंजन ठाकरे, शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. सामाजिक सलोखा राखा. चिथावणीखोर भाषण करू नका, ग्रामीण पोलिसांनी संशयितावर तत्काळ कारवाई केली आहे. मात्र सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. याकरिता सर्व मोबाइल कंपन्यांशी संपर्क साधून इंटरनेट सेवा खंडित करण्याचे आदेशानंतर सोशलमीडियावर अफवांचे पेव थांबल्याने आयुक्तांचे सर्वांनी अभिनंदन केले. शहरात कुठल्याही समाजाकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला.

समितीकरणार गावोगावी शांततेचे आवाहन : दलित-मराठासमन्वय समिती शहर जिल्ह्यात निर्माण झालेले जातीय तेढ दूर करण्यासाठी ही संयुक्त समिती शहर जिल्ह्यातील गावा-गावात जाऊन शांतता भाईचारा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हा रुग्णालयात पीडित मुलीच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर दोन्ही समाजाच्या नेत्यांनी या संयुक्त समितीची घोषणा केली. दोन्ही समाजाच्या नेत्यांमध्ये एकोपा बघण्यास मिळाला.

या मुद्द्यावर चर्चा
विशिष्ट समाजाचे चित्र लावलेली वाहने फोडण्याचे प्रकार शहरात सुरू आहेत. नियमाप्रमाणे असे फलक लावण्यास बंदी आहे. शहरात कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याकरिता वाहनांवरील फलक काढण्याचे आदेश पाेलिसांनी दिले अाहेत. शहरातील १० मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली अाहे. यामुळे अाळा बसणार अाहे. शहरात अवैध मद्य विक्रीवर बंदी घालणार सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या अॅडमिनवर कारवाईचा इशारा देण्यात अाला.


पोलिस यंत्रणा सक्षम
^शहरसुरक्षित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम आहे. राजकीय आणि सामाजिक पुढाऱ्यांनी दोन्ही समाजात सलोख्याचे वातावरण ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे. चिथावणी देणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. अफवांवर विश्वास ठेवता पोलिसांशी संपर्क साधावा. -डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस आयुक्त
बातम्या आणखी आहेत...