आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी ‘गैरमार्गाशी लढा’ अभियान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दरवर्षी दहावी, बारावी परीक्षांनंतर मोठय़ा प्रमाणावर उघडकीस येणार्‍या कॉपी प्रकरणे रोखण्यासाठी ‘गैरमार्गाशी लढा’ अभियान मंडळातर्फे राबवण्यात येत आहे. त्यातून कॉपी प्रकरणे व परीक्षांदरम्यानच्या गैरमार्गांना आळा बसणार असल्याचा विश्वास मंडळातर्फे व्यक्त केला जात आहे.

शिक्षक व पालक सभा, स्थानिक तसेच केंद्रस्तर दक्षता समिती निर्मितीबरोबरच गेल्या तीन वर्षांपासून शाळांमध्ये 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला ध्वजवंदन झाल्यावर विद्यार्थ्यांकडून ‘गैरमार्गापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा’देखील घेतली जात आहे. विद्यार्थ्याला ‘मी कॉपी करणार नाही’ असे वचन घेण्याचे निर्देश दिले जातात. या उपक्रमानंतर परीक्षा वेळापत्रक, माहिती, सवलतींची माहिती, परीक्षाकाळातील काळजी, शिक्षकसूची, गैरमार्ग प्रतिबंधक कायद्याची माहिती, पेपर सोडवतानाचे नियम, मंडळ हेल्पलाइनविषयी माहिती यांच्या सूचना व शंकासमाधान केले जात आहे.

100 टक्के कॉपी नियंत्रण
‘गैरमार्गाशी लढा’ या अभियानामुळे कॉपी प्रकरणे वा अन्य कोणत्याही प्रकारची गैरमार्ग अवलंबणारी प्रकरणे यापुढे होणार नाहीत. कॉपी प्रकरणांना तर 100 टक्के आळा बसेल असा विश्वास आहे. भगवान सूर्यवंशी, विभागीय सचिव

अभियानाचा परिणाम होणारच
बर्‍याच ठिकाणी परीक्षेदरम्यान गैरप्रकाराची उदाहरणे समोर येत होती. अनेक केंद्रांवर कॉपी पुरवली जात असल्याचेही उघड झाले. मात्र, या अभियानामुळे जवळपास 75 ते 80 टक्के फायदा झाल्याचे दिसून येत आहे. अभियानामुळे लवकरच 100 टक्के कॉपीमुक्ती होईल असे वाटते. राजेंद्र निकम, मुख्याध्यापक, सागरमल मोदी विद्यालय

स्थानिक दक्षता समितीचे कार्य
परीक्षा केंद्रावर बाहेरून होणारा उपक्रम थांबवणे
पोलिस बंदोबस्त ठेवणे
गैरमार्ग विरहित परीक्षेसाठी उद्बोधन, जनजागृती व वातावरण निर्मिती करणे
नियंत्रणाबाहेर जाणार्‍या उपद्रवी घटकांवर कारवाईसाठी पोलिस खात्याला सहकार्य करणे
ज्या गावात, शाळेत परीक्षा केंद्र नाहीत तेथे शाळा स्तर दक्षता समितीचे दोन सदस्य केंद्रस्तर दक्षता समितीत सहभागी होऊन कामकाज पाहतील.