आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोअर बँकिंग सेवा नेटवर्कअभावी फेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड - पंधरवड्यापूर्वी शहर पोस्ट कार्यालयात कोअर बॅँकिंग प्रणालीला सुरुवात झाली. मात्र, दुस-याच दिवसापासून ही सेवा नेटवर्क अभावी सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे ‘कात टाकणा-या पोस्टाच्या’ या काळसुसंगत सेवेच्या प्रारंभीच ग्राहकांच्या पदरी निराशा पडल्याची स्थिती आहे. नेटवर्क फेलमुळे सर्व संगणक बंद असल्यामुळे बचत बॅँकेचे कामकाज व व्यवहार होणार नाही, अशा मजकुराच्या फलकाने कार्यालयाच्या दर्शनी भागात जागा पटकविली आहे.
औरंगाबाद पोस्ट विभागात सर्वप्रथम मनमाड पोस्ट कार्यालयात 11 जूनपासून कोअर बॅँकिंग सेवेला प्रारंभ झाला. त्यामुळे ग्राहकांना राष्ट्रीयीकृत बॅँकाप्रमाणे या प्रणालीद्वारे तातडीने पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झाली. मालेगाव विभागाचे सहायक अधीक्षक एस. बी. मोरे यांनी, सर्वोत्तम सुविधेसाठी पोस्ट प्रयत्नशील असल्याचे उद्घाटनप्रसंगी आश्वस्त केले होते. मात्र, नेमका उलट अनुभव ग्राहकांना येत आहे. रखडत रखडत सुरू असलेल्या या सेवेने पोस्टाच्या कामकाजावरही परिणाम केला आहे. बचत खाते, पैसे काढणे, नवीन खाते उघडणे आदी कामे रेंगाळली आहेत. शहरासह ग्रामीण भागातील अनेक खातेदार आठ ते 10 किलोमीटर अंतरावरून आर्थिक व्यवहारासाठी पोस्टात येतात. मात्र, नेटवर्कच्या करामतीचा फलक वाचून त्यांना माघारी फिरावे लागते.
सदरची सेवा सुरळीत देण्याची ग्राहक मागणी करीत आहेत. पोस्टाच्या खातेदारांसह ग्राहक, बचत एजंट व ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत निवेदन दिले आहे.
सेवा विस्कळित, ग्राहक त्रस्त
- मनमाड पोस्ट कार्यालयातील बचत खात्याचे कामकाज विस्कळित झाले आहे. दररोज शेकडो खातेदार सुविधेअभावी व पोस्टात कामकाज होत नसल्याने परत ज
सुधारणेची अपेक्षा
- या कार्यालयात कोअर बॅँकिग सेवेत नेटवर्कअभावी सातत्याने व्यत्यय येत आहे. या प्रणालीत वरिष्ठ स्तरावरून तातडीने सुधारणा करून मिळावी, अशी अपेक्षा आहे. एस. डी. देसले, उपपोस्ट मास्तर, मनमाड