आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Corporate Culture In Government Office Of Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारी कार्यालयांतही आता कॉर्पोरेट कल्चर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शासनाची प्रतिमा ही जनतेशी संपर्क येणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या वागणुकीवर अवलंबून असते. सध्या राज्यात सरकारी कामकाजाची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. ती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने वर्ग एक आणि दोनच्या अधिकार्‍यांना दिले जाणारे पायाभूत प्रशिक्षण आता अराजपत्रित अधिकारी आणि वर्ग तीनच्या कर्मचार्‍यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र, तामिळनाडू आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प लवकरच सुरू हाेत आहे. सध्या राज्यात नाशिक, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात नव्याने रुजू झालेल्या तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कृषीसेवक यांना १२ दिवसांचे प्रशिक्षण महसूल प्रबोधिनीमध्ये संचालक विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. देशातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांचा वर्ग तीन आणि राजपत्रित अधिकार्‍यांशी थेट संबंध येत असतो. परंतु आतापर्यंत शासनाची प्रतिमा काही कर्मचार्‍यांमुळे बदनाम झाली होती. ही प्रतिमा बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कार्मिक, लोक शिकायत तथा पेन्शन येथील वर्ग एकच्या अधिकार्‍यांना हे प्रशिक्षण दिले जाते. मात्र या प्रशिक्षणाची खरी गरज नागरिकांची थेट संबंध येणार्‍या कर्मचार्‍यांना आहे, म्हणूनच हा प्रकल्प सध्या महाराष्ट्रासह तीन राज्यांत राबविण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे.

‘यशदा’वर जबाबदारी
नाशिक जिल्ह्यात नुकत्याच डिर्पामेंट ऑफ ट्रेनिंग पर्सोनल या पायाभूत प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला हे प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यात पाच प्रशिक्षण देण्यात येणार असून राज्यात २५ प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आले आहे. या प्रशिक्षणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेवर सोपविण्यात आली.

प्रशिक्षण कशाचे
प्रत्येक जिल्ह्यातील ४० कर्मचार्‍यांना प्रशिक्षण. नागरिकांची सेवामूल्ये, योगा, स्वच्छ भारत अभियान, ई गर्व्हनन्स आणि आयसीटी, नेतृत्वगुण, कौशल्ये, ध्येयनिश्चिती, सेवाभावी दृष्टिकोन व वागणूक, प्रभावी संवाद, वेळेचे व्यवस्थापन, तणाव व्यवस्थापन, कार्यालयीन व्यवस्थापन, महाराष्ट्र नागरी सेवा नियम, वित्तीय व्यवस्थापन आरटीआय याविषयी प्रशिक्षण देणार.

तणावमुक्तीसाठी योगा
प्रशिक्षणातील शिबारार्थींना ‘बायफ’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी केलेली सकारात्मक कामे, नगर परिषद, महापालिकेतील कामाची पद्धत आणि तणावमुक्त राहण्यासाठी प्रजापती केंद्रात योगाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विवेक गायकवाड, संचालक नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी