आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षा १५० कोटींची, मिळाले 3 कोटी 9 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआर उपक्रमांतर्गत जिल्ह्यास १५० कोटींची अपेक्षा असताना अवघे 3 कोटी 9 लाख रुपये विविध कंपन्या आणि देवस्थांनाकडून प्राप्त झाले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत तोकडी रक्कम असून, त्यात वाढ करण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली असून प्रांत-तहसीलदारांना त्यांच्या हद्दीतील कंपन्यांना याबाबत सूचित करण्याच्या सूचनाही वरिष्ठस्तरावरून देण्यात आल्या आहेत.
कुठल्याही व्यावसायिक कंपनीने एकूण नफ्याच्या टक्के रक्कम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी (सीएसआर) अर्थात व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्वा पोटी सामाजिक कामांवर खर्च करणे अनिवार्य आहे. त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यास जवळपास कोटी लाख रुपये मिळाले आहे. ते जलयुक्त शिवार अभियानासाठी खर्च केले जात आहे, तर लायन्स क्लबनेही थेट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटंुबीयांना प्रत्येक १५ हजार रुपये, घरातील महिलेला साडी आणि महिनाभराचा शिधा देत त्यांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतरिक्त यंदा सिंहस्थाचे वर्ष असल्याने अनेक कंपन्यांनी सिंहस्थातच मदत करत आपले सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण केले आहे. शिवाय शासकीय मदतही तोकडी पडत असल्याने सामाजिक संस्था, कंपन्यांकडून मदत मिळण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे आता या उपक्रमात बसत असलेल्या कंपन्यांना कमीत कमी दुष्काळी स्थितीची जाणीव करत मदतीचे अावाहन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन स्तरावरून लागलीच प्रांत-तहसीलदारांवर सोपविण्यात आली आहे. शिवाय सर्वच मदतगार संस्था, कंपन्यांनी स्वत:हून मदत करावी अशी प्रशासनाकडून विनंतीही करण्यात अाली आहे.

या खासगी संस्थांनी केली मदत
शिर्डीसंस्थान - कोटी, सिद्धि विनायक ट्रस्ट, मुंबई - कोटी, बॉश कंपनी, नाशिक- ५५ लाख, कोकाकोला- ४० लाख, सॅमसोनाइट कंपनी -७ लाख, अल्ट्राटेक सिमेंट- लाख ८० हजार, जिंदाल पॉलीफिल्म -३ लाख १५ हजार असे कोटी लाख रुपये मिळाले आहे. त्यात गाळ काढणे, के. टी. वेअर बंधारे बांधणे दुरुस्ती, चर खोदने अशी कामे करण्यात आली आहे.