आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेवर नजर ठेवणारे चारही कॅमेरे बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी एकीकडे १७ कोटी रुपयांच्या कॅमेरा खरेदीचा घाट घातला जात असताना, दुसरीकडे मात्र महापालिका मुख्यालय तसेच विभागीय कार्यालयात बसवलेले १३ लाख रुपयांचे कॅमेरे दोन महिन्यांपासून बंद पडले आहेत.

सुरक्षारक्षकांनी पत्र दिल्यानंतरही उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मागील काळात पालिकेत धाेकेदायक शस्त्र सर्रासपणे लाेक खिशात घेऊन फिरत असल्याचे समोर आले होते. एका कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता मुख्य द्वारावर कसून तपासणी केल्यावरच अभ्यागतांना प्रवेश दिला जाताे. याबराेबरच अनुचित प्रकार राेखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले. त्यात महापालिकेत नविडणुकीदरम्यान पालिकेत चार कॅमेरे बसवण्यात आले. त्यासाठी १३ लाख रुपये खर्च करून रेकाॅर्डिंग युनिटही कार्यान्वित करण्यात आले. सद्यस्थितीत हे कॅमेरे बंद पडले असून, सुरक्षारक्षकांनी दाेन ते तीन वेळा कॅमेरे सुरू करण्याबाबत पत्र देऊनही पालिका प्रशासनाकडून याबाबत कारवाई झालेली नाही. अशी स्थिती असताना दुसरीकडे, पालिकेने सुरक्षेच्या कारणास्तव १७ कोटी रुपयांच्या कॅमेरे खरेदीची तयारी चालवली आहे. कोट्यवधी रुपयांची खरेदी करायची प्रत्यक्षात देखभालीकडे मात्र दुर्लक्ष करण्याच्या प्रकारामुळे पालिकेला सुरक्षेविषयी कितपत रस आहे, हेही स्पष्ट हाेत आहे.
मुख्य प्रवेशद्वारावरच तपासणी
सद्यस्थितीत पालिकेच्या केवळ मुख्य प्रवेशद्वारावरच अभ्यागतांची तपासणी हाेत आहे. याव्यतििरक्त पालिकेत येण्यासाठी दाेन महत्त्वाची प्रवेशद्वारे असून, येथे तपासणीची काेणतीही व्यवसथा नाही. येथे सुरक्षारक्षक नेमले असले तरी त्यांना काेणीही जुमानत नाही. राजकीय कार्यकर्त्यांकडून त्यांनाच दमदाटी करण्याचेही प्रकार हाेतात, अशा पारिस्थितीत मुख्य द्वारावरील नजर चुकवून काेणी पालिकेत प्रवेश करून गैरकृत्य केेले तर शाेधणे अवघड ठरेल, अशा पार्श्वभूमीवर कॅमेरे महत्त्वपूर्ण ठरत होते.