आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभारी प्रशासन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर नगरसेवकांचा आक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकाशिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी किरण कुंवर यांच्या वादग्रस्त कारकीर्दीमुळे त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर प्रशासन अधिकारीपदी जिल्हा परिषदेतील राजीव म्हसकर यांची नियुक्ती झाली. परंतु, म्हसकर यांनी कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच सहायक आयुक्त वसुधा कुरणावळ यांच्याकडे प्रभारी जबाबदारी सोपविण्यात आल्याने या नियुक्तीस काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला अाहे. म्हसकर यांच्याकडे पदभार सोपविण्याऐवजी कुरणावळ यांच्याकडे जबाबदारी दिल्याने याबाबत येत्या महासभेत विषय मांडणार असल्याची माहिती नगरसेवक संदीप लेनकर यांनी दिली.

शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारीपदी कार्यरत असताना कुरणावळ यांची कारकीर्दही वादग्रस्त ठरली होती. समायोजन बदल्या, आरटीई २००९ कायदा, एकतर्फी शिक्षक भरती, पुस्तके खरेदी प्रकरण याबाबत कुरणावळ यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडेच जबाबदारी का सोपविण्यात आली, असा सवाल करीत म्हसकर यांना पदभार देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक लेनकर यांनी केली असून, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनाही ते निवेदन देणार आहेत. योग्य निर्णय झाल्यास येत्या महासभेत हा विषय मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे यासंदर्भातील निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...